घरमुंबईमध्य रेल्वेच्या गलथानपणा विरोधात प्रवासी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

मध्य रेल्वेच्या गलथानपणा विरोधात प्रवासी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

Subscribe

मध्य रेल्वे प्रत्येक रविवारी मेगा ब्लॉक घेऊनसुद्धा रेल्वे मार्गवर कधी रुडाला तडा जातो तर कधी सिग्नल यंत्रणात बिघाड होतो, त्यामुळे लोकल सेवा नेहमीच उशिरा असते. मात्र आता काही बिघाड नसतानासुद्धा लोकल सेवा उशिरा असल्याच्या तक्रार प्रवाशांकडून ऐकू येत आहे. कारण त्याचा त्रास प्रवासी दररोज सहन करत आहेत.

मध्य रेल्वेच्या सतत बिघाडाच्या घटनेमुळे मागील काही दिवसांपासून मध्य रेल्वे विस्कळीत होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्यामुळे प्रवाशांना हाल तर होतच आहे. सोबतच लेट मार्क लागत आहे. यासंबंधित महाराष्ट्र रेल्वे महिला प्रवासी महासंघटनेकडून शुक्रवारी मध्य रेल्वेचे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतली. तेव्हा त्याचे ऐकून घेतले नाही. सोबतच वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीचे उत्तर त्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र रेल्वे महिला प्रवासी महासंघटनेकडून मध्य रेल्वेच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत आंदोलन करण्याच्या इशारा दिला आहे.

अधिकाऱ्यांचे उडवा-उडवीचे उत्तरे

मध्य रेल्वे प्रत्येक रविवारी मेगा ब्लॉक घेऊनसुद्धा रेल्वे मार्गवर कधी रुडाला तडा जातो तर कधी सिग्नल यंत्रणात बिघाड होतो, त्यामुळे लोकल सेवा नेहमीच उशिरा असते. मात्र आता काही बिघाड नसतानासुद्धा लोकल सेवा उशिरा असल्याच्या तक्रार प्रवाशांकडून ऐकू येत आहे. कारण त्याचा त्रास प्रवासी दररोज सहन करत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवासी संघटनांनी आता यावर समाधान काढण्यासाठी बैठाका सुरु केल्या आहेत. तर शुक्रवारी महाराष्ट्र रेल्वे महिला प्रवासी महासंघटनाकडून मध्य रेल्वेचे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतली. सतत होत असल्येल्या बिघाडाबद्दल आणि लोकल सेवा उशिरा धावत असल्याच्या तक्रारींवर विचारणा केली असता मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नरेंद्र पवार यांनी उडवा-उडवीचे उत्तर दिले, अशी माहिती महाराष्ट्र रेल्वे महिला प्रवासी महासंघटनेच्या वंदना सोनावणे यांनी ‘आपलं महानगर’शी बोलतानी दिली. ‘जर रेल्वे प्रवाशांना योग्य सुविधा दिली नाही अथवा रेल्वेचे रळगाने असेच सुरु राहिले तर आम्ही मध्य रेल्वेविरोधात आंदोलन सुरु करू’, असा इशारा सुद्धा वंदना सोनावणे यांनी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -