घरमुंबईसंतप्त रुग्णाच्या नातेवाईकांची हॉस्पिटलमध्ये तोडफोड

संतप्त रुग्णाच्या नातेवाईकांची हॉस्पिटलमध्ये तोडफोड

Subscribe

जेजे हॉस्पिटलमधील डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीची घटना ताजी असताना मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्येही असाच प्रकार घडला आहे. काल रात्री हृदयविकाराने मृत्यू पावलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी गोंधळ घातला. परंतु पोलिसांनी तत्काळ दखल घेऊन परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. २९ मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास मीरा रोड येथे राहणाऱ्या सय्यद इशान हैदर रिजवी (५२) यांना वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये अत्यंत गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले होते. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे त्यांचे शरीर कोणत्याही उपचाराला प्रतिसाद देत नव्हते. परंतु डॉक्टरानी वैद्यकीय प्रयत्न सुरु ठेवले. तब्बल ४० मिनिटांच्या प्रयत्नांनानंतरही डॉक्टरांना यश आले नाही आणि रात्री ११ वाजता रुग्णाला मृत घोषित करण्यात आले.

हॉस्पिटलच्या वस्तूंचे नुकसान

रिजवी यांच्या मृत्यूची बातमी समजतात नया नगर येथील त्यांच्या नातेवाईक व मित्रमंडळींनी हॉस्पिटलमध्ये दाखल होत कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घातली. संतापलेल्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असताना हॉस्पिटलच्या सुरक्षा रक्षकांनी पोलिसांना बोलावले. हॉस्पिटल व नातेवाईकांचा जबाब नोंदवून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता रुग्णावर योग्य उपचार झाले नसल्याचा नातेवाईकांचा आरोप पोलिसांनी फेटाळून लावला.

- Advertisement -

 

“रस्ते अपघात, रेल्वे अपघात किंवा कोणतीही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती असो आमच्या येथे २४ तास सुरु असलेल्या इमर्जन्सी वार्डमध्ये आम्ही संबंधित रुग्णांवर उपचार करतो. वर्षभरात आम्ही ४०० हून अधिक रुग्णांचे प्राण वाचवलेत. या इमर्जन्सी वार्डमध्ये ८ तज्ज्ञ डॉक्टर्स तसेच नर्सेस व पॅरामेडिकल स्टाफ सतत उपलब्ध असतो. मात्र यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलवर खोटे आरोप केले. तसेच आमच्या कर्मचाऱ्यांना खूप त्रास दिला . या केसची संपूर्ण माहिती आणि सीसीटीव्ही फुटेज संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना सुपूर्द केले असून आमच्या मालमत्तेत झालेल्या तोडफोडीबद्दल मीरा रोड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.”
-रवी हिरवाणी, केंद्रप्रमुख, वोक्हार्ट हॉस्पिटल, मीरा रोड

हॉस्पिटलच्या वस्तूंचे नुकसान

नया नगर पोलिस स्टेशनमधील मुख्य पोलीस अधिकारी बालाजी पांढरे यापुढील तपास करीत असून वोक्हार्ट हॉस्पिटलला पोलीस सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -