परळ – हिंदमाता दरम्यान पादचारी पूल; 5 कोटींचा खर्च

मुंबई महापालिका परळ येथे स्थानिकांना ये - जा करणे सुलभ होण्यासाठी 5 कोटी रुपये खर्चून लवकरच पादचारी पूल उभारणार आहे. या पादचारी पुलाला सरकते जिन्यांची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.

mumbai municipal corporation election 2022 in December or January?

मुंबई महापालिका परळ येथे स्थानिकांना ये – जा करणे सुलभ होण्यासाठी 5 कोटी रुपये खर्चून लवकरच पादचारी पूल उभारणार आहे. या पादचारी पुलाला सरकते जिन्यांची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे केईएम, टाटा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची गैरसोय दूर होण्यास मोठी मदत होणार आहे. (Pedestrian bridge between Parel – Hind Mata 5 crore outlay)

हिंदमाता – परळ परिसर जलमुक्त करण्यासाठी हिंदमाता – परळ पूल जोडण्यात आला. परिणामी, यंदाच्या पावसाळ्यात हिंदमाता परिसरात पावसाळ्यात पाणी साचण्याचे प्रमाण अगदीच कमी झाले. त्यामुळे वाहनचालक, पादचारी यांना मोठा दिलासा मिळाला. महापालिकेने, परळ येथे पादचाऱ्यांना ये – जा करणे सुलभ व्हावे यासाठी पादचारी पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, या पुलाला सरकते जिन्यांची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिका 4 कोटी 87 लाख रुपये खर्च करणार आहे.

वास्तविक, परळ भागात सर्व प्रकारच्या आजारांसाठी केईएम, कॅन्सरसाठी टाटा आणि लहान मुलांच्या आजारांवर उपचार करण्यासाठी वाडिया ही तीन मोठी रुग्णालये आहेत. या तिन्ही रुग्णालयात दररोज शेकडोंच्या संख्येने रुग्ण येत असतात. या रुग्णांसोबत त्यांचे नातेवाईकही असतात. मात्र सदर रुग्णालयासमोरील पदपथावर फेरीवाले अतिक्रमण करून बसलेले असतात. तर दुकानदारांनीही पदपथावर काही प्रमाणात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे या तिन्ही रुग्णालयात उपचरासाठी येणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना ये – ज करणे जिकिरीचे होते. अनेकदा लहान – मोठे अपघातही घडले आहेत.

पादचाऱ्यांना परळ ब्रिजला किंवा हिंदमाता पुलाला वळसा घालून जावे लागते. पादचाऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी दोन्ही पुलांच्या सखल भाग असलेल्या ठिकाणी पादचारी पूल बांधण्याचा निर्णय घेतल्याचे पालिकेच्या पूल विभागाचे मुख्य अभियंता सतीश ठोसर यांनी सांगितले.

हिंदमाता परळ परीसरात पावसाळ्यात ठप्प पडणाऱ्या वाहतुकीवर उपाय म्हणून महानगर पालिकेने दोन उड्डाण पुलात कनेक्टर तयार केला आहे. हा कनेक्टर १२ मीटर उंच आहे. त्यामुळे हा परिसर पूरमुक्त झाला आहे.

वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच हिंदमाता व परळ उड्डाणपूल जोडल्याने वाहतूक कोंडीची समस्या दूर झाली आहे. मात्र एकिकडे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी पादचाऱ्यांची मात्र काहीशी गैरसोय होऊ लागली आहे. पादचाऱ्यांना परळ ब्रिजचा वळसा घालून इकडून तिकडे जावे लागते. किंवा चित्रा सिनेमा येथून वळसा घालून पलिकडे जावे लागते. पादचाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आता दोन्ही पुलावर पादचारी पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.


हेही वाचा – राज्यातील रेल्वे स्थानकांवर स्वातंत्र्यलढ्याचे विविध पैलू प्रदर्शित करणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन