घरताज्या घडामोडीठाणे, कल्याण डोंबिवलीत जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन

ठाणे, कल्याण डोंबिवलीत जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन

Subscribe

ठाणे, कल्याण डोंबिवलीत जमावबंदीच्या आदेशाचे उलंघन करण्यात आले. त्यामुळे अखेर पोलिसांना लाठीचा प्रसाद द्यावा लागला.

करोनाचा संसर्ग वाढू नये, या पार्श्वभूमीवर राज्यात १४४ कलम लागू करण्यात आले असून नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. मात्र, ठाणे, कल्याण आणि डोंबिवली परिसरात या आदेशाचे सर्रासपणे उल्लंघन करण्यात आले. अनेक हौशी नागरिक गरज नसताना देखील रस्त्यावर आले, त्यामुळे अनेकांना पोलिसांच्या लाठीचा प्रसादही खावा लागला. त्यामुळे जनतेला शासकीय आदेशाचे गांभिर्य नसल्याचेच यातून स्पष्ट हेात आहे.

त्यामुळे पोलिसांना द्यावा लागला लाठीचा प्रसाद

करोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यात ३१ मार्चपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने, बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आले आहेत. त्यामुळे विनाकारण नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घरातच राहावे, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. मात्र, सरकारच्या आदेशाकडे दुर्लक्ष होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारपासून १४४ कलम लागू केले आहे. पाच पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्रीत फिरण्यास बंदी आहे. एकिकडे सरकार नागरिकांना गर्दी करू नका. घरात रहा, असे आवाहन वारंवार करीत असतानाच दुसरीकडे मात्र, सरकारच्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. ठाण्यात रस्त्यावर चारचाकी गाड्या मोठया प्रमाणात बाहेर पडल्या होत्या. ठाण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांमुळे घोडबंदर परिसरातही एकच कोंडी झाली होती. तर कल्याण डोंबिवलीत अनेक हौशी नागरिक रस्त्यावर फिरताना दिसत होते. शासनासह पोलीस प्रशासनाने केलेल्या आवाहनालाही नागरिक दाद देत नसल्याने अखेर पोलिसांना आपला खाक्या दाखवण्याची वेळ आली. दरम्यान, शहर पोलिसांकडून मेगा फोनच्या आधारे रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना घरीच थांबण्याचे आवाहन करीत होते. मात्र, तरीसुध्दा अनेकजण बाहेर पडले होते. त्या व्यक्तींना पोलिसांनी लाठीचा प्रसाद देण्याबरोबरच रस्त्यावरच उठाबशा काढायला लावल्या.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: कर्फ्युनंतर लोकांची गावाकडे धाव; ग्रामीण भागात भीतीचे वातावरण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -