नवी मुंबईत पार्टीसाठी पोलिसांची परवानगी लागणार

तुम्ही जर नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी तुमच्या सोसयटी किंवा इमारतीच्या गच्चीवर ओल्या पार्टीचे आयोजन करत असाल तर यासाठी नवी मुंबई पोलिसांची परवानगी घेणे महत्त्वाचे असणार आहे. तुम्ही जर परवानगी न घेता पार्टी केली तर तुमच्या विरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे पार्टीविषयी पोलिसांना कळवणे गरजेचे आहे.

peoples have to take permission of police in navi mumbai for 31st party

२०१८ वर्षाच्या अखेरच्या दिवशी म्हणजे थर्टी फर्स्टच्या दिवशी विविध ठिकाणी सेलेब्रेशनसाठी दरवर्षी पार्ट्यांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी देखील बार, पब, गच्ची आणि सोसायट्यांमध्ये ओल्या पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु, तुम्ही जर नवी मुंबईचे रहिवाशी असाल तर तुमच्यासाठी ही बातमी फार महत्त्वाची आहे. तुम्ही जर नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी तुमच्या सोसयटी किंवा इमारतीच्या गच्चीवर ओल्या पार्टीचे आयोजन करत असाल तर यासाठी नवी मुंबई पोलिसांची परवानगी घेणे महत्त्वाचे असणार आहे. तुम्ही जर परवानगी न घेता पार्टी केली तर तुमच्या विरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे पार्टीविषयी पोलिसांना कळवणे गरजेचे आहे.

पोलिसांनी का घातल्या अटी?

गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्या आगीचे सत्र सुरु आहे. गेल्यावर्षी मुंबईच्या लोवर परळ विभागातील कमला मिल कंपाऊंड येथील मोजोजो या पबला पार्टी दरम्यान आग लागली होती. या अग्नितांडवात शेकडो लोक मृत्यूमुखी पडले होते. त्यामुळे असे गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी खबरदारी म्हणून नवी मुंबई पोलिसांनी परवानगीची अट घातली आहे. बऱ्याच वेळा मद्यपान प्राषान केलेल्या तरुणांमध्ये वाद होतात. या वादाचे रुपांतर गुन्ह्यात होते. त्यामुळे पोलिसांना पार्टी विषयी कळवणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर दारु पिवून नशेत कुणीही गाडी चालवू नये असे आवाहन नवी मुंबई पोलिसांनी केले आहे. तरीही जर कुणी नशेत दारु पिऊन गाडी चालवताना आढळ्यास त्याच्याविरोधात कारवाई होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.


हेही वाचा – लोकांना 31st ची पार्टी रात्रभर करु द्या; आदित्य ठाकरेंची मागणी