Eco friendly bappa Competition
घर अर्थजगत पेपरफ्राय कंपनीचे CEO अंबरीश मूर्ती यांचे निधन; वर्षभरात कंपनी आली नावारूपाला

पेपरफ्राय कंपनीचे CEO अंबरीश मूर्ती यांचे निधन; वर्षभरात कंपनी आली नावारूपाला

Subscribe

मुंबई | प्रसिद्ध ऑनलाइन फर्नीचर कंपनी पेपरफ्रायचे (Pepperfry Company) को-फाऊंडर आणि सीईओ अंबरीश मूर्ती (Ambareesh Murty) यांचे निधन झाले आहे. अंबरीश मूर्ती यांचे वयाच्या 51 व्या वर्षी अखेरचा श्वास घतेला असून ते लेहमध्ये असताना अंबरीश मूर्तींना कार्डियक अरेस्ट (हृदयविकाचा झटका) आल्याने मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

अंबरीश मूर्तींच्या निधनाची माहिती ही पेपरफ्राय ऑनलाइन फर्निटर स्टोअरचे दुसरे सह-संस्थापक आशिष शाहा यांनी ट्वीट करत ही माहिती दिली. या ट्वीटमध्ये आशिष शाहांनी ट्वीटमध्ये म्हणाले, “माझे मित्र, मेन्टॉर आणि भाऊ अंबरीश मूर्ती यांचे निधन झाले आहे. हे सांगताना मला अत्यंत दु:ख होत आहे. काल रात्री अंबरीश मूर्तींना लडाखमध्ये कार्डियक अरेस्ट (हृदयविकाचा झटका) मृत्यू झाला.

- Advertisement -

अंबरीश मूर्तींचा असा आहे प्रवास

1990च्या दशकात अंबरीश मूर्ती यांनी दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून इंजिनीअरिंग केली. यानंतर 1996 मध्ये आयआयएम (IIM) कोलकाता येथे त्यांनी एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर अंबरीश मूर्ती हे कॅडबरी कंपनीमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून काम केले. कंपनीने त्यांना एरिया सेल्स मॅनेजर केल्यानंतर ते केरळला गेले होते. अंबरीश मूर्तींनी 5 वर्षानंतर कपंनी सोडली. कॅडबरी कंपनी सोडल्यानंतर अंबरीश मूर्तीने 2 वर्षांसाठी ICICI प्रुडेन्शियल AMCमध्ये म्युच्यअल फंड प्रोडक्ट लाँच कसे करायचे हे शिकले. यानंतर 2005 मध्ये ब्रिटानियामध्ये मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम केले.

- Advertisement -

हेही वाचा – Delhi Service Bill : राष्ट्रवादीत दोन गट नाहीत… EC ला जे सांगितले, ते राज्यसभेत दिसले!

कंपनीला वर्षभरात मिळाले यश

अंबरीश मूर्तींनी 2012 मध्ये आशिष शहा यांच्यासोबत पेपरफ्राय या फर्निचर आणि होम डेकोरसाठीच्या एक ई-कॉमर्स कंपनीची स्थापना केली. या कपंनी वर्षभरात फर्निचर आणि होम डेकोर व्यवसायात मोठे यश मिळाले.

- Advertisment -