मुंबई : मुंबईसह उपनगरातील गणेशोत्सव म्हणजे गणेशभक्तांसाठी एक पर्वणीच. दरवर्षी मोठ्या हर्षोल्हासात गणेशोत्स साजरा केल्या जातो. यंदाही अनेक गणेश मंडळांनी तब्बल दोन महिन्याआधीच गणरायाच्या आगमनाची तयारी केली होती. मात्र, महत्वाच्या तयारीपैकी एक म्हणजे महानगरपालिकेकडून मिळणारी रितसर परवानगी.(Permission applications of 500 Ganesha mandals not fulfilling the conditions rejected Cause of traffic jams)
यंदा तब्बल 3 हजार 700 गणेश मंडळानी रितसर परवानगीसाठी अर्ज केले होते. यापैकी 3 हजार 100 मंडळांनी अटींचे पालन केल्याचे दिसून आल्याने त्यांना परवानगी देण्यात आली आहे. तर उर्वरीत 500 मंडळाची परवानगी नाकारण्यात आली आहे.
मुंबईतील गणेशोत्सव म्हणजे नवचैतन्याची नुसती उधळण. सर्वत्र जल्लोष आणि उत्साह दिसून येतो. कोरोना काळात या गणेशोत्सव साजरा करण्यावर निर्बंध आले होते. मात्र, आता सर्वच सण-उत्सव निर्बंधमुक्त साजरे केले जात असून, यंदाचा गणेशोत्सव त्यापैकीच एक आहे. सध्या मुंबई शहर आणि उपनगरात गणरायांच्या आगमनाची लगबग सुरू असून, त्यामध्ये काही गणेश मंडळे अजूनही परनागीसाठी रांगेत असल्याचे दिसून येत आहे.
3 हजार 100 गणेश मंडळाना परवानगी
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप परवानगीसाठी ऑनलाइन अर्जाची सुविधा मुंबई महापालिकेकडून यंदा 1 ऑगस्टपासून उपलब्ध करण्यात आली होती. रविवारपर्यंत मुंबई महापालिका क्षेत्रातील तब्बल 3 हजार 100 मंडळांना पालिकेकडून परवानगी मंजूर करण्यात आली आहे. तर अद्यापही काही मंडळे परवानगीच्या प्रक्रियेमध्ये असून, सोमवारपर्यंत त्यांच्या परवानग्या अंतिम होतील अशी माहिती पुढे येत आहे.
3 हजार 700 अर्ज झाले होते प्राप्त
मुंबई पालिकेकडून यंदा गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांना मंडप परवानगीसाठी एक खिडकी पद्धतीतून ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पालिकेकडे यंदा मंडप परवानगीसाठी तब्बल 3 हजार 700 मंडळांनी अर्ज केले आहेत. यापैकी 3100 मंडळाना परनागी देण्यात आली आहे.
यामुळे नाकारली 500 गणेश मंडळांची परवानगी
गणेश मंडळांना परवानगी घेण्यासाठी घालून दिलेल्या काही नियमांचे पालन करणे गरजेचे असते. या नियमांच्या पालनामधे 3100 गणेश मंडळे उत्तीर्ण झाले असून, उर्वरित 500 मंडळांकडून उभारण्यात येणाऱ्या मंडपामुळे वाहतुकीस अडथळा येऊ शकतो, शिवाय काही अटींची पूर्तता या मंडळांनी केली नसल्याचे लक्षात आल्यावर वाहतूक पोलिस किंवा इतर काही प्राधिकरणांकडून परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
हेही वाचा : मुलीला वडिलांशी भेटू दिले नाही तर फ्लॅटच्या मालकी हक्क…; मुंबई उच्च न्यायालयाची महिलेला तंबी
विनाशुल्क दिली जाते मंडळाना परवानगी
मंडपांसाठी मंडळांना परवानगीकरिता शुल्क भरणे आवश्यक नसून, मंडप परवानगी नि:शुल्क आहे. तर 100 रुपये सुरक्षा अनामत रक्कम भरणे आवश्यक आहे. आत्तापर्यंत याबाबतचे 3 हजार 700 अर्ज मुंबई महापालिकेकडे आले होते. यांपैकी 3 हजार 100 परवानग्या देण्यात आल्या आहेत.