भल्या सकाळी मुंबई लोकलमध्ये महिलांच्या डब्यात जाऊन अश्लील चाळे करणाऱ्या एका विकृताला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईच्या सीएसएमटी स्टेशनवर हा प्रकार घडत होता. महिलांच्या डब्यात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे या विकृताची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं. दिनेश लक्ष्मण दुवरे असं या विकृत तरुणाचं नाव असून तो कर्जतचा राहणारा आहे. या सगळ्या प्रकारामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सीएसएमटीहून सुटणाऱ्या लोकलचं वेळापत्रकही प्रभावित झालं होतं. गाडी स्वच्छ केल्याशिवाय सोडता येत नसल्यामुळे अनेक लोकल उशिराने सोडल्या जात होत्या. त्यावरही आता नियंत्रण येणार आहे.
महिलांच्या डब्यात करायचा हस्तमैथुन
सीएसएमटीहून कर्जत-कसाऱ्याच्या दिशेने सुटणाऱ्या लोकलमध्ये विकृत दिनेश सकाळी सहाच्या सुमारास शिरायचा. सकाळच्या वेळी लोकलमध्ये गर्दी अगदीच कमी असते. त्यात सीएसएमटीहून डाऊन दिशेने जाणारी लोकल आणि त्यातही महिलांचा डबा तर रिकामाच असतो. याचाच गैरफायदा घेऊन दिनेश महिलांच्या जब्यात घुसायचा. डब्यात हस्तमैथुन करायचा. त्यानंतर सोबत आणलेली मानवी विष्ठा महिलांच्या डब्यातल्या सीट्सवर पसरवून लावायचा आणि पसार व्हायचा. गेल्या काही दिवसांमध्ये त्याने एक दोनदा नव्हे, तर तब्बल १० वेळा हा गलिच्छ प्रकार केला होता. पण त्याची ओळख पटत नव्हती. अखेर एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा विकृत कैद झाला.
सापळा रचून केली अटक
सीसीटीव्ही फुटेज हाती आल्यानंतर पोलिसांनी तातडीनं चक्र फिरवली. तरुणाचा छायाचित्रासह शोध सुरू केला. अखेर बराच शोध घेतल्यानंतर त्याचा पत्ता लागला. दिनेश भायखळ्यामध्ये मजूर म्हणून काम करतो. रात्री उशिरा कामावरून सुटत असल्यामुळे तो सीएसएमटी स्थानकावर जाऊन तिथेच झोपायचा. आणि सकाळी उठून महिलांच्या डब्यात शिरून हे अश्लिल कृत्य करायचा. शुक्रवारी सकाळी पोलिसांनी सापळा रचून सीएसएमटी स्थानकावरून त्याला अटक केली.
मानसिक आनंदासाठी सगळं केल्याची कबुली
ताब्यात घेतल्यानंतर पोलिसी दट्ट्या दिल्यानंतर दिनेश दुवरेने गुन्हा कबुल केला. ‘मानसिक आनंद मिळवण्यासाठी आपण हे सगळं करायचो’, अशी कबुलीच दिनेशने दिली. त्यामुळे त्याच्या मानसिक स्थितीविषयीही पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. त्याच्या कबुलीवरून तो मनोरुग्ण असावा, असा संशय पोलिसांना आहे.
तुम्ही हे वाचलंत का? – व्हॉटअॅपवरुन अश्लील व्हिडिओ पाठवणारा गजाआड