Petrol Diesel Price: इंधन दरवाढीचा भडका, सलग सातव्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्या

एक लीटर पेट्रोलसाठी मुंबईकरांना १०१.०३ रुपये माजावे लागत आहेत.

Petrol and diesel prices increases for seventh day in a row
Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होणार नसल्याचा केंद्रीय मंत्र्यांचा इशारा, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

देशात इंधन दरवाढीचा चांगलाच भडका उडाला असून सलग सातव्या दिवशी देशातील पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. आंतराराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलांच्या किंमती वाढल्याने याचा पेट्रोल डिझेलच्या किंमतींवर मोठा परिणाम झाला आहे. पेट्रोलमागोमाग आता डिझेलच्या किंमतींनीही शंभरी ओलांडली आहे. आज पेट्रोलच्या किंमतीत ३० पैशांनी वाढ झाली आहे तर डिझेलच्या किंमतीत ३५ पैशांनी वाढ झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत जवळपास ३०-३५ पैशांनी वाढ झाली आहे. देशातील महत्त्वाच्या शहरातील आजच्या पेट्रोल डिझेलच्या किंमती जाणून घ्या.

तेल कंपनी IOCL च्या माहितीनुसार, दिल्लीतत एक लीटर पेट्रोलसाठी १०४.४४ रुपये मोजावे लागत आहेत. तर मुंबईत पेट्रोलचे दर हे दिल्लीहून अधिक आहेत. मुंबईत एक लीटर पेट्रोलचे दर ११०.४१ रुपये इतके आहेत. तर एक लीटर डिझेलसाठी मुंबईकरांना १०१.०३ रुपये माजावे लागत आहेत. दिल्लीत डिझेलच्या किंमतींनी शंभरी ओलांडला नसला तरी दिल्लीत एक लीटर डिझेलसाठी ९३.१७ रुपये मोजावे लागत आहेत.

कोलकत्ता येथे पेट्रोल १०५.०५ रुपये प्रति लीटर तर डिझेल ९६.२४ रुपये प्रति लीटर आहे. चेन्नईमध्ये देखील पेट्रोलच्या किंमती शंभरीपार गेल्यात. चेन्नईत पेट्रोलच्या किंमती १०१.७६ रुपये प्रति लीटर आहेत तर डिझेलची किंमत ९७.५६ रुपये प्रति लीटर इतकी आहे.

ऑक्टोबर महिन्यात इंधन दरवाढीचा भडका उडाल्याचे पहायला मिळाले. मुंबई आणि हैद्राबादनंतर गुजरातमध्ये डिझेलच्या किंमतींनी शंभरी ओलांडली आहे. भोपाळ, रायपूर आणि जयपुरमध्ये डिझेलच्या किंमती १०० पार गेल्या आहेत. मागील सात दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे.


हेही वाचा – स्वखर्चाने लस घेतली, मग प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो हटवा, हायकोर्टात याचिका दाखल