Petrol Diesel Price: सलग चौथ्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्या, पहा आजचे दर

गेल्या ११ दिवसांत पेट्रोलच्या किंमतीत २.३५ रुपयांनी वाढ

Petrol Diesel Price hike on occasion of Dussehra
Petrol Diesel Price: दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईकरांना पेट्रोलसाठी मोजावे लागणार १११ रुपये

पेट्रोल डिझेलच्या किंमतीत सलग चौथ्या दिवशी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाचे दर वाढल्याने भारतात त्याचा मोठा फटका बसला आहे. पेट्रोलिय कंपन्यांनी जाही केलेल्या किंमतींनुसार पेट्रोलच्या किंमतीत ३० पैशांनी तर डिझेलच्या दरात ३५ पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईमध्ये आज एक लिटर पेट्रोलसाठी १०९.५४ रुपये मोजावे लागतील तर एक लिटर डिझेलसाठी ९९.९२ रुपये मोजावे लागणार आहेत. देशातील इतर प्रमुख राज्यातील पेट्रोल डिझेलच्या किंमती किती आहेत जाणून घ्या.

दिल्ली

पेट्रोल – १०३.५४ रुपये प्रति लीटर
डिझेल – ९१.७७ रुपये प्रति लीटर

कोलकत्ता

पेट्रोल – १०४.२३ रुपये प्रति लीटर
डिझेल – ९५.२३ रुपये प्रति लीटर

चेन्नई

पेट्रोल – १०१.०१ रुपये प्रति लीटर
डिझेल – ९६ रुपये प्रति लीटर

१८ सप्टेंबरपासून देशात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. मागील आठवड्यात बुधवारी आणि सोमवारी पेट्रोल डिझेलच्या किंमती स्थिर होत्या. गेल्या ११ दिवसांत पेट्रोलच्या किंमतीत २.३५ रुपयांनी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या किंमती ३.५० रुपयांनी वाढल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलांच्या किंमती वाढ झाल्याने गुरुवारी ब्रेंट क्रूड ०.४५ डॉलरने वाढले आहेत. त्याचप्रमाणे डब्ल्यूटीआई क्रूड ही ०.५७ डॉलरने वाढून ७८.८७ डॉलर प्रति बॅरलवर पोहचला आहे.

पेट्रोल डिझेलच्या किंमती दररोज सकाळी सहा वाजता बदलल्या जातात. सकाळी सहा वाजता पेट्रोल डिझेलच्या नव्या किंमती लागू केल्या जातात. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनांचे दर वाढल्यास पेट्रोल डिझेलच्या किंमतीतही वाढ होते. पेट्रोल डिझेलच्या किंमती SMS च्या माध्यमातूनही जाणून घेता येऊ शकतात. इंडियन ऑईलच्या बेवसाईटवरुन RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाईप करुन ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवल्यास दररोज पेट्रोल डिझेलच्या किंमती एका SMS द्वारे आपल्याला कळू शकतात. त्याचप्रमाणे BPCL ग्राहक RSP लिहून ९२२३११२२२२ या क्रमांकावर पाठवू शकतात.


हेही वाचा – देशात सलग १४ वर्षे मुकेश अंबानी टॉपर, संपत्ती ५० टक्क्यांनी वाढली