घरताज्या घडामोडीPetrol Diesel Price: पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होणार नसल्याचा केंद्रीय मंत्र्यांचा इशारा,...

Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होणार नसल्याचा केंद्रीय मंत्र्यांचा इशारा, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

Subscribe

मुंबईत सलग नवव्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या किंमतींचा भडका

देशातील इंधनांच्या किंमतीचा भडका उडाला आहे. आज सलग चौथ्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. सर्वासामान्यांना या वाढत्या किंमतींचा मोठा फटका बसला आहे. देशातील चार प्रमुख शहरांपैकी मुंबईत पेट्रोल डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. आज मुंबईत पेट्रोलच्या किंमतीत ३४ पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईत आज एक लीटर पेट्रोलसाठी १११.७७ रुपये मोजावे लागणार आहेत. तर डिझेलच्या किंमतींनी शंभरी ओलांडली असून सातत्याने डिझेलच्या किंमती वाढत आहेत. मुंबईत आज एक लीटर पेट्रोलसाठी १०२.५२ रुपये मोजावे लागत आहेत.

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलांच्या किंमतीत मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढ झाल्याने मागच्या चार दिवसात पेट्रोल डिझेलच्या दरात एकूण १रुपये ४० पैशांची वाढ झाली आहे. तर पेट्रोल डिझेलच्या किंमती पुढील काही दिवस कमी होणार नाहीत, असा इशारा केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिला आहे. शनिवारी दिल्लीतील एका कार्यक्रमात ते बोलत होते. कोरोना काळाआधीच्या तुलनेत पेट्रोल १०-१५ टक्क्यांनी महाग झाले आहे तर डिझेल ६-१० टक्क्यांनी महागले. या किंमती स्थिर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले.


तुमच्या शहारातील पेट्रोल डिझेलच्या किंमती

- Advertisement -

मुंबई

पेट्रोल – १११.७७ रुपये प्रति लीटर
डिझेल – १०२.५२ रुपये प्रति लीटर

दिल्ली

पेट्रोल – १०५.८४ रुपये प्रति लीटर
डिझेल – ९४.५७ रुपये प्रति लीटर

कोलकत्ता

पेट्रोल – १०६.४३ रुपये प्रति लीटर
डिझेल – ९७.६८ रुपये प्रति लीटर

चेन्नई

पेट्रोल – १०३.०१ रुपये प्रति लीटर
डिझेल – ९८.८४ रुपये प्रति लीटर

 

आपण पाहिले तर मुंबईत सलग नवव्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या किंमतींचा भडका उडाला आहे. मुंबईत पेट्रोल पाठोपाठ डिझेलच्या किंमतींनी शंभारी ओलांडली. दसऱ्याच्या मुहूर्तावरही पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्या होत्या. वाढत्या किंमतींमुळे मुंबईकरांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे.


हेही वाचा – Covid-19 Vaccine : अमेरिकेच्या आरोग्य सल्लागारांची J&J लसीच्या बूस्टर डोसला मान्यता

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -