Petrol Diesel Price: मुंबईत पेट्रोल शंभरीच्या उंबरठ्यावर; जाणून घ्या आजचे दर

जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर.

petrol price increase
पेट्रोलच्या दरात वाढ

देशात पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे याचा सामान्यांना फटका बसत असून दररोज होणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे वाहनचालकांचे पुरते कंबरडे मोडले आहे. पेट्रोल-डिझेलचे दर कधी कमी होणार असा एकच प्रश्न वाहनचालकांकडून विचारला जात आहे. त्यातच आता मुंबईत पेट्रोल शंभरीच्या उंबरठ्यावर आले आहे. त्यामुळे आता मुंबईकर चांगलेच संतापले आहेत. आज पेट्रोलच्या दरात २५ पैशांनी वाढ झाली असून दिल्लीत पेट्रोल ३१ पैशांनी वाढले आहे. त्यामुळे सातत्याने होणारी दरवाढ कधी थांबणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.

पेट्रोल, डिझेलचे आजचे दर

मुंबईत पेट्रोलची किंमत २५ पैशांनी वाढली असून पेट्रोल ९७ रुपयांवर पोहोचले आहे. तर डिझेल ८८ रुपये झाले आहे. तसेच दिल्लीत पेट्रोलची किंमत ३१ पैशांनी तर डिझेलची किंमत ३३ पैशांनी वाढली असून पेट्रोल ९०.१९ रुपये झाले आहे. तर डिझेल ८०.६० रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या दहा दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे. दिल्लीत गेल्या १० दिवसात पेट्रोल ३.२४ रुपयांनी तर डिझेल ३.४९ रुपयांनी वाढले आहे.

कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीतही सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रति बॅरेली इतकी वाढली आहे.

६ वाजल्यापासून लागू होतात नवे दर

पेट्रोल-डिझेलचे दर दररोज सकाळी ६ वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल, डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमतही दुप्पट होते. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल-डिझेलचे दर बदलतात.


हेही वाचा – भंडारा आग दुर्घटना : दोन परिचारीकांविरोधात गुन्हा दाखल