Petrol Diesel Rate: सलग १८व्या दिवशी पेट्रोल डिझेलचे दर जैसे थे, जाणून घ्या आजचे दर

५ राज्यात झालेल्या निवडणूकींनंतर पेट्रोलियम कंपन्या इंधन दरवाढ करण्याची शक्यता

Petrol diesel Rate: For the 18th day in row,rates of petrol and diesel were the same,see today's rate
Petrol diesel Rate: सलग १८व्या दिवशी पेट्रोल डिझेलचे दर जैसे थे, जाणून घ्या आजचे दर

काही महिन्यांपूर्वी पेट्रोल डिझेलच्या दरांनी शंभरी गाठली होती. परंतु गेल्या काही दिवसात सातत्यानी पेट्रोलच्या दरात कोणताही वाढ झालेली पहायाला मिळालेली नाही. सलग १८व्या दिवशी पेट्रोल डिझेलचे दर जैसे थे पहायला मिळाले. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या भावात ७० डॉलरच्या दिशेने जाताना दिसत आहेत. मात्र भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक राज्यांत लॉकडाऊन असल्याने पेट्रोल डिझेलच्या मागणीत घट झाल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊनमुळे पेट्रोल डिझेलची मागणी कमी झाली आहे. असे असले तरी ५ राज्यात झालेल्या निवडणूकींनंतर पेट्रोलियम कंपन्या इंधन दरवाढ करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबईत आज पेट्रोलचे दर ९६.८२ रुपये इतके आहे. तर डिझेलचे दर ८७.८१ रुपये इतके आहेत. तर राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल ९०.४०रुपये आणि डिझेलचे दर ८०.८३ रुपये इतके आहे. चेन्नईतही एक लीटर पेट्रोलचे दर ९२.४३ रुपये आहेत. तर डिझेल ८५.७३ रुपये आहे.

इतर राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर

कोलकत्ता
पेट्रोल – ९०.६२ रुपये
डिझेल – ८३.६१ रुपये

बंगळुर
पेट्रोल – ९३.४३ रुपये
डिझेल – ८५.६० रुपये

मध्य प्रदेश, भोपाळ
पेट्रोल – ९८.४१ रुपये
डिझेल – ८८.९८ रुपये

सिंगापूरमध्ये कच्च्या तेलाच्या भावातही वाढ झाली आहे. सिंगापूरमध्ये ब्रेंट क्रूडचा दर ६७.०८ डॉलर इतका आहे. एप्रिल महिन्यात ब्रेंट क्रूडच्या दरात ८ टक्क्यांनी वाढ झाल्याचे पहायला मिळाले आहे. देशात पाच राज्यांच्या निवडणूकांमुळे आता पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कच्च्या तेलांच्या किंमतीत होणारी वाढ आणि रुपयांचे होणाऱ्या अवमूल्यनामुळे पेट्रोलियम कंपन्यावरील दवाबही वाढला आहे.


हेही वाचा – हायकोर्टाचं खच्चीकरण करायचं नाही, लोकशाहीचे ते महत्वाचे स्तंभ, ECI च्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे मत