घरताज्या घडामोडीमुंबई पालिकेचा जगात डंका! कोरोना रोखण्यासाठी फिलिपिन्स राबवणार 'धारावी पॅटर्न'

मुंबई पालिकेचा जगात डंका! कोरोना रोखण्यासाठी फिलिपिन्स राबवणार ‘धारावी पॅटर्न’

Subscribe

फिलिपिन्समधील झोपडपट्ट्यांमध्ये शिरकाव केलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी फिलिपिन्स सरकार 'धारावी पॅटर्न'चा वापर करणार आहे.

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमधील कोरोना रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने राबवलेल्या ‘धारावी पॅटर्न’चे कौतुक WHO ने केले होते. आता मुंबई महापालिकेचा ‘धारावी पॅटर्न’ फिलिपिन्स राबवणार आहे. यामुळे आता कोरोना रोखण्यासाठी मुंबई पालिकेने जगाला ‘धारावी पॅटर्न’ दिला, असे म्हणायला हरकत नाही. फिलिपिन्समधील झोपडपट्ट्यांमध्ये शिरकाव केलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी तिथले सरकार ‘धारावी पॅटर्न’चा वापर करणार आहे.

फिलिपिन्समध्ये धारावीसारख्या अनेक झोपडपट्ट्या असून लोक दाटीवाटीने राहतात. या झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. आता कोरोनाचा संसर्ग रोखणे फिलिपिन्स सरकारच्या आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे तिथला कोरोना संसर्ग रोखण्यासाठी फिलिपिन्स सरकारने मुंबई महापालिकेशी संपर्क साधला असून धारावी पॅटर्नची पालिकेकडून माहिती घेतली आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी याबाबतची माहिती दिली. कोरोना रोखण्यासाठी ‘चेस द व्हायरस’ हे आमचे मुख्य उद्दिष्ट राहिले आहे. योग्य वेळी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी चेस द व्हायरसचा प्रभावीपणे उपयोग झाला आहे. हीच पॉलिसी फिलिपिन्स सरकारलाही लागू करायची आहे. आम्ही त्यांना धारावीच्या या पॅटर्नची ब्ल्यूप्रिंट दिली आहे, असे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले.

- Advertisement -

धारावी पॅटर्न

धारावी पॅटर्न अत्यंत साधा आहे. सर्वात आधी संशयित रुग्णाची आरोग्य तपासणी करा, कोरोनाचा संशय वाटला तर त्याची टेस्ट करा, त्यातून कोरोनाची लागण झाल्याचे कळताच रुग्णाला क्वारंटाइन करा. या धोरणाचा वापर धारावी येथे केला आणि धारावीकरांनीही हा पॅटर्न स्वीकारला. त्यामुळे धारावीतील कोरोनाचा संसर्ग रोखण्यात आम्हाला यश आलं, असे आयुक्त इक्बाल सिंह चहल म्हणाले.

पालिकेच्या माहितीनुसार, मुंबईतील २४ वार्डांमध्ये कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा दर ८६ दिवस आहे. पूर्वी एका दिवसात ४ हजार टेस्ट होत होत्या. आता १२ हजार टेस्ट होत आहेत. जुलैमधील आकडेवारीनुसार धारावीतील कोरोना संक्रमणाचा दर ०.८ असून भारतातील हा सर्वात कमी दर आहे. तर करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा दर ८१ टक्के आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या सुद्धा घटली असून हा दर ४.८ इतका झाला आहे. सध्या कोरोनाची लक्षणे असलेले धारावीतील ५३८८ बाधित रुग्णालयात दाखल आहेत. तर १७ हजार ८०० रुग्ण सक्रिय आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – एक देश, एक रेशन कार्ड योजना कासवगतीने


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -