मुंबई : महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 107 हुतात्म्यांना हुतात्मा स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनम्र अभिवादन केले. यावेळी मुंबईतील हुतात्मा स्मारक येथे स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी मंत्रिमंडळातील प्रमुख नेते आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. (PHOTO Chief Minister Eknath Shinde along with dignitaries saluted 107 martyrs on the occasion of Martyrs Memorial Day)
महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 107 हुतात्म्यांचा आज स्मृतिदिन
एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील हुतात्मा स्मारक येथे स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते.
मुखमंत्री एकनाथ शिंदे यांना 107 हुतात्म्यांना हातात्मा स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन केले.
हुतात्मा स्मारकाजवळ एकनाथ शिंदेंसह यावेळी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल, राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्यासह उपस्थितांनी पुष्पचक्र वाहून अभिवादन केले.