‘मिसेस कोहली’ म्हटल्यावर अनुष्काने दिलेली प्रतिक्रिया व्हायरल; पहा व्हिडीओ

अनुष्काला 'मिसेस कोहली' म्हणून हाक मारायला सुरुवात केली. त्यावेळी अनुष्काने दिलेल्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

anushkasharma
अनुष्काला 'मिसेस कोहली' म्हणून हाक मारायला सुरुवात केली. त्यावेळी अनुष्काने दिलेल्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली ही जोडी लोकप्रिय जोडी आहे. त्यामुळे या दोघांना एकत्र पाहणे त्यांच्या चाहत्यांना आवडते. त्या दोघांचे फोटो आणि व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. इतकेच नाही त्यांचे चाहते त्यांना एकमेकांची नाव घेऊन चिडवताना दिसतात. असाच काहीसा प्रकार नुकताच घडला आहे . अनुष्का एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. इथे फोटोग्राफर्सने अभिनेत्रीला फोटोसाठी विनंती केली तसेच, अनुष्काला ‘मिसेस कोहली’ म्हणून हाक मारायला सुरुवात केली. त्यावेळी अनुष्काने दिलेल्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

कार्यक्रमात अनुष्काने हजेरी लावल्यानंतर फोटोग्राफर्सने अनुष्काला पाहून ‘मिसेस कोहली’ असे ओरडायला सुरुवात केली. ते ऐकून अनुष्का लाजली. हसत ती म्हणाली, ‘रिलॅक्स! तुम्ही सगळे का ओरडताय? थांबा! मी कालपासून ओरडत आहे.’ तिच्या या उत्तरानंतर फोटोग्राफर्सने म्हणाले की, अशा कार्यक्रमांमध्ये आम्हाला तुमची आठवण येते, हे ऐकल्यावर अनुष्का हसली आणि म्हणाली माझे कान वाजत आहेत. अनुष्काचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

अनुष्का शर्माला जेव्हा ‘मिसेस कोहली’ म्हटले तेव्हा ती हसली, परंतु तिच्या चाहत्यांना मात्र पॅपाराझीचं तिला मिसेस कोहली असा आवाज देणं आवडलं नाही. नेतकऱ्यांनी फोटोोग्राफर्सने केलेल्या वक्तव्यावर राग व्यक्त केला आहे. एका यूजरने लिहिले की, ‘तिची स्वतःची एक ओळख आहे. तिला मिसेस कोहली म्हणायची काय गरज आहे? दुसऱ्या युजरने लिहिले की, मीडियाने हे असे वागणे योग्य नाही. याशिवाय यूजर्स अनुष्काच्या लुकचे भरभरुन कौतुकही करताना दिसले.

https://www.instagram.com/p/CqLtQ1qDTAN/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again

( हेही वाचा: क्रिकेटर्स अभिनय करणार तर कलाकारही…; जाहिरातीचा 3 इडियट्स स्टाईल व्हिडीओ व्हायरल )

लवकरच या चित्रपटात दिसणार अनुष्का

या कार्यक्रमात अनुष्का ब्लॅक हाय स्लिट गाऊनमध्ये पोहोचली होती. नेहमीप्रमाणेच अनुष्काने आपल्या कार्यक्रमाला चार चांद लावले. तिने फोटोग्राफर्सना पोज दिल्या. तिच्या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, अनुष्का लवकरच झूलन गोस्वामीच्या जीवनावर आधारित ‘चकदा एक्सप्रेस’ या चित्रपटात दिसणार आहे.