घरताज्या घडामोडीपहिल्यांच दिवशी एसटी-बेस्टचा उडाला फज्जा; फिजिकल डिस्टन्सिंग वाजले तीन तेरा!

पहिल्यांच दिवशी एसटी-बेस्टचा उडाला फज्जा; फिजिकल डिस्टन्सिंग वाजले तीन तेरा!

Subscribe

मिशन बिगीन अगेन अंतर्गत सोमवारपासून खासगी कार्यालयांना १० टक्के कर्मचार्‍यांसह काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे या कर्मचार्‍यांच्या सुविधेसाठी बेस्ट आणि एसटी बसेस सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र पहिल्याच दिवशी पूर्ण:ता बेस्टआणि एसटी बसेसचा फज्जा उडाला आहे. अपुर्‍या बस फेर्‍यामुळे सकाळीपासून अनेकांनी बेस्ट बसेस पकडण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. तर अनेकांना बसमध्ये उभे राहूण प्रवास करण्याची वेळ आली होती. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचे पुर्णता तीन तेरा वाजले. तसेच यामुळे मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आणि कामगारांनी लोकल सेवा काही अंशत: सुरू करण्याची मागणी शासकीय कर्मचार्‍यांनी केली आहे

दोन महिन्यांनंतर मुंबईत ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत पुन्हा बेस्ट, एसटीच्या बस सुरू करण्यात आल्या. मिशन बिगीन अगेनच्या टप्प्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, मंत्रालय, अन्य शासकीय कार्यालयांमध्ये पंधरा टक्के उपस्थिती केली आहे. तर खासगी कार्यालयांना १० टक्के कर्मचार्‍यांसह काम करण्याची परवानगी देखील देण्यात आली. त्यामुळे सोमवारी, प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी बेस्टने २ हजार १०० बसेस आणि एसटीने अतिरिक्त २५० बसचे नियोजन केले होते. मात्र या सगळ्या नियोजनावर पहिल्याच दिवशी पाणी फेरले गेल्याचे चित्र मुंबई आणि उपनगरांच्या वेगवेगळ्या भागांमध्ये दिसून आले आहे. या भागांमध्ये अगदी भल्या पहाटेपासूनच प्रवाशांनी बससाठी रांग लावल्याची दिसून आले. मात्र बेस्ट बसचा पत्ता नव्हता त्यामुळे मुंबईकरांमध्ये नाराजीचे आणि संतापाचे वातावरण दिसून येत होते. त्यासोबत बेस्टचे अपुरे नियोजन पुन्हा एकदा उघड झाले आहे.

- Advertisement -

एसटी आणि पनवेल, पालघर, आसनगाव ,विरार, नालासोपारा ,वसई, बदलापूर येथून मंत्रालय, महापालिका भवन या मार्गावर सोमवारी एसटी बस धावल्या. मात्र एसटीमध्ये कर्मचार्‍यांना उभ्याने प्रवास करण्याची वेळ आली. तसेच विरार-नालासोपार्‍यातून मुंबईच्या दिशेने येणार्‍या मुंबईकरांना सकाळीच कार्यालयात जाण्यासाठी बेस्ट बसची आशा होती. मात्र त्यांची ही आशा फोल ठरली आहे. दिवसभरात बेस्टने या मार्गावर २० बसेस सोडल्यामुळे सकाळपासूनच मुंबईकरांनी रांगा लावल्या होत्या. मात्र ज्या बसेस येत होत्या. त्या अत्यावश्यक सेवा कर्मचार्‍यांसाठीच असल्याचे त्यांना सांगितले जात होते. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे. तसेच मुंबईच्या अनेक भागांमध्ये बेस्ट बसेस उपलब्ध नसल्यामुळे मुंबईकरांनी खासगी गाड्या रस्त्यावर आणल्या. त्यामुळे ट्रॅफिक जामचा देखील अनेकांना सामना करावा लागत आहे.

फिजिकल डिस्टन्सिंग तीन तेरा

एसटी आणि बेस्टकडून फिजिकल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करण्यात येईल, असा दावा केला होता. परंतु, पहिल्याच दिवशी हा दावा खोटा ठरल्याचे दिसून आले. बेस्टच्या बसेसमध्ये तुफान गर्दी दिसून आली. तसेच १० पेक्षा जास्त प्रवासी उभ्याने प्रवास करत होत. त्यामुळे संपुर्णपणे फिजिकल डिस्टन्सिंग नियामाचे तीन तेरा वाजले आहे. अनेक प्रवाशांनी बेस्ट आणि एसटी प्रशासनाच्या कार्यपध्दतीवर नाराजाची व्यक्त केली आहे. अनेकांना बसने न मिळाल्याने परत घरचा रस्ता पकडवा लागला आहे. तर काही नागरिकांनी गर्दी असल्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेत, घरीच राहण्याचा पर्याय स्वीकारला.

- Advertisement -

एसटी आणि बेस्टच्या बसेस अपुर्‍या पडत आहेत, त्यामुळे कर्मचार्‍यांना अनेक समस्यांना समोर जावे लागत आहे. बसेस कितीही वाढवल्या तरी प्रवासातील दगदग कमी होणार नाही. त्यामुळे त्वरित लोकल सुरू करणे आवश्यक आहे. पुणे, नाशिक येथून देखील रेल्वे प्रवास सुरू झाला पाहिजे. एसटी आणि बेस्टचा बसेसचे फिजिकल डिस्टन्सिंग पालन करायाला हवे आहे. – ग.दि.कुलथे, संस्थापक व मुख्य सल्लागार, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -