Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई ‘तुळसीराम’ चा प्लाझ्मा ‘तुळसीदास’ला!

‘तुळसीराम’ चा प्लाझ्मा ‘तुळसीदास’ला!

- महापालिका रुग्णालयाचा अजब कारभार

Related Story

- Advertisement -

रुग्णाच्या नावात असलेल्या साधर्म्यामुळे कोरोनाबाधित रुग्णाऐवजी कोरोनाची लागण न झालेल्या रुग्णाला प्लाझ्मा देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार भाईंदरमधील टेंबा रुग्णालयात घडला आहे.

मीरा-भाईंदर महापालिकेच्या पंडित भीमसेन जोशी या शासकीय रुग्णालयात चक्क नावाच्या गोंधळामुळे प्लाझ्माचा घोळ झाल्याचे उघडकीस आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोरोनाबाधित रुग्णाला प्लाझ्मा न देता कोरोनाची लागण नसलेल्या रुग्णाला प्लाझ्मा चढवण्यात आल्याने दोन्ही रुग्णांच्या जीवाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisement -

पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. या रुग्णालयात ३० मार्च रोजी तुलसीराम पांड्या या ४८ वर्षीय इसमाला कोरोनाची बाधा झाल्याने उपचाराकरता दाखल करण्यात आले होते. या रुग्णाची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्यामुळे ५ एप्रिल रोजी प्रथम या रुग्णाला प्लाझ्मा चढवण्यात आला होता. मात्र तरीदेखील प्रकृतीत सुधार होत नसल्यामुळे पुन्हा ६ एप्रिलला प्लाझ्माची आवश्यकता असल्याची मागणी डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांकडे केली. त्यानुसार रुग्णाच्या भावाने ४० हजार रुपये खर्च करून भांडूप येथून प्लाझ्मा आणून रुग्णालयाला सुपूर्द केला.

यादिवशी ६ एप्रिलला रुग्णालयात तुळसीदास नावाचे दुसरे रुग्ण दाखल झाले होते. या रुग्णाचा अद्यापही कोरोना अहवाल प्रलंबित असताना ‘तुळसीदास’ यांना ‘तुळसीराम’ समजून प्लाझ्मा चढवण्यात आला. केवळ नावाच्या गोंधळामुळे दोन रुग्णांचा जीव धोक्यात आल्याने त्यांच्या कुटुंबियांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

हा प्रकार प्लाझ्मा दिल्यानंतर लक्षात आला आहे. सध्या दोन्ही रुग्णांना योग्य उपचार देण्याकडे आमचा भर आहे. तसेच या संदर्भात संपूर्ण चौकशी करून कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. तेजश्री सोनावणे यांनी दिली.

- Advertisement -