घरमुंबईप्लास्टिक बंदीने पेपरच्या रद्दीला तेजी

प्लास्टिक बंदीने पेपरच्या रद्दीला तेजी

Subscribe

न्यायालयाचा निर्णय येताच पर्यावण मंत्री रामदास कदम यांनी २३ तारखेपासून प्लास्टिक बंदी लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. सरकारने निर्णय जाहीर केल्यापासून रद्दी पेपरला तेजी आली. सुरुवातीला किलोमागे १० रुपये रद्दीला मिळायचे. आता तो दर २५ रुपयांवर गेला आहे.

राज्यात प्लास्टिकची बंदी होणार म्हणून गेल्या काही दिवसांपासून पेपरच्या रद्दीला भाव येत होता. कालपासून अखेर बंदी लागू झाल्यादिवशी तर रद्दीने किलोला २५ रुपयांचा भाव घेतला आहे. प्लास्टिक बंदीला सरकारने कुठलाही पर्याय दिलेला नाही. यामुळे पर्याय म्हणून लोक आता पेपरच्या रद्दीला आपलेसे करू लागले आहेत. मुंबईत ही रद्दी २५ रुपयांपासून ७५ रुपयांच्या दराने विकली जात असल्याची माहिती या रद्दीचे विक्रेते ताजुभाई परमार यांनी दिली. एकार्थी प्लास्टिक बंदीने घरच्या पेपरला किंमत आलीय. एकीकडे पिशवीसाठी ओरड करणाऱ्या गृहिणींना रद्दीच्या किंमतीने हात दिला आहे.
राज्य सरकारने २३ तारखेपासून प्लास्टिकवर बंदी घातली आहे. या बंदीची अधिसूचना तीन महिन्यांपूर्वीच काढण्यात आली होती. मात्र प्लास्टिक उद्योगांच्या वतीने न्यायालयात दावा दाखल केल्याने अधिसूचना निघूनही बंदी लागू होत नव्हती. अखेर परवा न्यायालयाने उद्योजकांचा दावा फेटाळून लावत बंदी कायम करण्यास सरकारला संमती दिली.

पेपरच्या रद्दीला तेजी

न्यायालयाचा निर्णय येताच पर्यावण मंत्री रामदास कदम यांनी २३ तारखेपासून बंदी लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली.सरकारने निर्णय जाहीर केल्यापासून रद्दी पेपरला तेजी आली. सुरुवातीला किलोमागे १० रुपये रद्दीला मिळायचे. आता तो दर २५ रुपयांवर गेला आहे. तर इंग्रजी वर्तमानपत्रांची रद्दी ३० रुपयांवर गेली आहे. रद्दी लागू झाल्याच्या शनिवारी तर रद्दीच्या पाव किलोचे दर १० रुपये आकारले जात होते. किरकोळ बाजारातील भाजीपाला, मासळी, मटण यासाठी किलोहून कमी प्रमाणात रद्दी लागते. यासाठी पावकिलोला १० रुपयांचा दर आकारला जातो आहे. याआधी प्लास्टिकची बंदी ज्या शहरांमध्ये लागू करण्यात आली होती त्याच शहरात रद्दीची किंमत वाढत असे. आता बंदीचा निर्णय हा पूर्ण राज्यासाठी लागू करण्यात आल्याने रद्दीचा दर राज्यभर वाढल्याचे ताजुभाई म्हणाले. प्लास्टिक बंदीसाठी ५ ते १० हजार रुपये दंड आकारण्यात येणार असल्याने सर्वांनीच ही बंदी मनावर घेतली आहे. दंड आकाराला जाऊ नये म्हणून बहुसंख्य लहान व्यापाऱ्यांनी प्लास्टिक पिशवी ऐवजी रद्दी पेपर वापरण्यास सुरुवात केली आहे. शिवाय रद्दीच्या पिशव्या करण्याचा लघुउद्योगही अनेक ठिकाणी सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यासाठी लागणाऱ्या रद्दीलाही चांगली किंमत दिली जाते आहे.

- Advertisement -

प्लास्टिक पिशव्यांची जागा कागदाने घेतली

आधी विक्रेत्यांकडून भाजी, मटण इत्यादी पदार्थ प्लास्टिक पिशवीत दिले जायचे. आता प्लास्टिक पिशव्यांची जागा कागदाने घेतली आहे, अशी माहिती दहिसर येथे रद्दीचा व्यवसाय करणारे महेंद्रकुमार जैन यांनी दिली. आधी एक किलो रद्दीच्या बदल्यात आम्ही १० रुपये ग्राहकाला द्यायचो. त्याच एक किलोसाठी व्यापारी आम्हाला १२ रुपये देतात. हीच रद्दी आम्ही किरकोळ दुकानदाराला विकल्यास आम्हाला एक किलोसाठी २० ते २५ रुपये मिळतात असे केसरीया जैन यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -