Thursday, April 15, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई रिक्षा, टॅक्सीपाठोपाठ रेल्वे तिकीटही महागले

रिक्षा, टॅक्सीपाठोपाठ रेल्वे तिकीटही महागले

मध्य रेल्वेचा प्लॅटफॉर्म तिकीट दरात पाच पटीने वाढ

Related Story

- Advertisement -

देशात पेट्रोल, डिझेल, रिक्षा, टॅक्सी भाववाढीनंतर आता रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीटांमध्येही दरवाढ आहे. वाढत्या कोरोनामुळे आधीच सामान्यांना फटका बसत असताना रेल्वेची वाढती दरवाढ सामान्यांना आर्थिक संकटात टाकणार आहे. मात्र वाढत्या कोरोनाला टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. रेल्वे स्थानकांवरील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशानसानाने ही प्लॅटफॉर्म तिकीट दरात मोठी भाव वाढ केली आहे. त्यामुळे प्रवाशांना १० रुपयांच्या प्लॅटफॉर्म तिकिटासाठी तब्बल ५० रुपये मोजावे लागणार आहेत.  रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिट दरात पाचपट वाढ केली आहे.
मुंबईतील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकिटांसाठी ही नवीन दरवाढ लागू असणार आहे. विशेषत: ज्या स्थानकांवरून बाहेरगावी जाणाऱ्या मेल, एक्सप्रेस गाड्यांना थांबा आहे अशा स्थानकांवर ही दरवाढ झाली आहे.

यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, पनवेल, भिवंडी रोड या स्थानकांचा समावेश आहे. मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिट दरवाढ लागू केली आहे. त्यामुळे प्रवाशांना आता मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्म तिकिटासाठी १० रुपयांऐवजी ५० रुपये मोजावे लागणार आहेत. ज्या प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक गर्दी होते अशा स्थानकांवरील गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्ग वाढला आहे. त्यातच बाहेरगावी जाण्यासाठी प्रवाशी तसेच त्यांचे नातेवाईक रेल्वे स्थानकात गर्दी करत नियम धाब्यावर बसवतात. त्यामुळे रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिट ५० रुपये केले असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले. २४ फेब्रुवारीपासून ही नवीन दरवाढ लागू झाली असून ही सुट्ट्यांच्या हंगामापर्यंत म्हणजे १५ जून २०२१ पर्यंत लागू असणार आहे.


हेही वाचा- सरकारच्या मानसिकतेवरच हल्ला, इंधन दरवाढीवरून दरेकरांचा सरकारवर हल्लाबोल

- Advertisement -

 

- Advertisement -