Platform Ticket: खुशखबर! प्लॅटफॉर्म तिकीट झालं स्वस्त

Platform Ticket Rate Discrease Central Railway Station
Platform Ticket: खुशखबर! प्लॅटफॉर्म तिकीट झालं स्वस्त

कोरोना महामारीमुळे भारतीय रेल्वेकडून लागू करण्यात आलेले निर्बंधात आता शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. ही सुरुवात मध्य रेल्वेकडून प्लॅटफॉर्म तिकिटचे दर कमी करण्यासापासून झाली आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT), ठाणे, कल्याण आणि पनवेल स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकीटची किंमत ५० रुपयाहून १० रुपये केली आहे. लसीकरण झालेल्या लोकल प्रवाशांना रेल्वेने विशेष सुविधा दिली आहे.

अनिल कुमार लाहोटी पुढे म्हणाले की, रेल्वेने युटीएस मोबाईल अॅपला महाराष्ट्र सरकारच्या युनिव्हर्सल पाससोबत जोडले आहे. ज्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, त्या स्थानिक प्रवाशांना आपल्या फोनवर तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अँड्राईडसाठी युटीएस अॅप आधीपासून उपलब्ध आहे आणि आता आयओएसवर देखील उपलब्ध झाला आहे. लोकल ट्रेन पाससाठी यूटीएस अॅपच्या या सुविधेचा आजपासून उपयोग केला जाईल.

आठ नव्या एसी लोकल सुरू

सोमवारपासून पश्चिम रेल्वे मुंबईत आठ नव्या वातानुकूलित लोकल (AC local) सुरू केल्या आहेत. यामुळे वातानुकूलित लोकलची संख्या आता २० झाली आहे. पीटीआयच्या एका वृत्तानुसार, या आठ नव्या सेवांमध्ये चार ‘अप’ आणि ‘डाऊन’ दिशेला धावतील आणि दोन लोकल गर्दीच्या वेळी चालवल्या जातील.


हेही वाचा – Netravati Express : नेत्रावती एक्सप्रेसच्या कोच संरचनेत बदल