घरमुंबईस्कूल व्हॅनचालकांकडून विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ

स्कूल व्हॅनचालकांकडून विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ

Subscribe

अंधेरीतील व्हीडिओने खळबळ

मुंबई :स्कूल बसमध्ये विद्यार्थ्यांची बेकायदा वाहतूक करणे कायद्याने गुन्हा असला तरी मुंबईतील अनेक ठिकाणी स्कूल व्हॅनमध्ये विद्यार्थ्यांची सर्रास बेकायदा वाहतूक करण्यात येत आहे. अंधेरीतील वर्सोवा येथील एका व्हॅनमध्ये अशाप्रकारे होत असलेल्या बेकायदा वाहतुकीमुळे खळबळ माजली आहे.

अंधेरी येथील वर्सोवा पोलीस ठाण्याच्या परिसरात सी.डी. बर्फीवाला, ए.एच. वाडिया अशा अनेक शाळा आहेत. या शाळेतील मुले शाळा सुटल्यानंतर वर्सोवा पोलीस ठाण्यासमोरूनच स्कूल व्हॅनमध्ये बेकायदा पद्धतीने क्षमतेपेक्षा अधिक मुलांची वाहतूक करण्यात येते. परंतु याकडे पोलिसांकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप स्कूल बस असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी केला.

- Advertisement -

कायदेशीरबाबींची पूर्तता करून नियमानुसार चालणार्‍या शाळा बसवर वाहतूक पोलिसांकडून वारंवार कारवाई करण्यात येते. या बसचालकांकडे बसचे फिटनेस प्रमाणपत्रही असते. तरीही त्यांच्यावर कारवाई होते. परंतु पोलीस ठाण्यासमोरच बेकायदा वाहतूक करणार्‍या स्कूल व्हॅनकडे पोलिसांकडून उघडपणे दुर्लक्ष करण्यात येते.

या स्कूल व्हॅनचालकांकडून पोलिसांना हफ्ते देण्यात येत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप अनिल गर्ग यांच्याकडून होत आहे. अंधेरी येथील वर्सोवा येथे नुकतेच एका स्कूल व्हॅनमधून मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची ने-आण करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीयोमुळे मुंबईत खळबळ माजली असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -