घरताज्या घडामोडीकरोना प्रतिबंधासाठी पंतप्रधानांनीच दिल्या टीप्स

करोना प्रतिबंधासाठी पंतप्रधानांनीच दिल्या टीप्स

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना आवाहन करत करोना व्हायरसच्या भीतीने घाबरून जाण्याचे कारण नाही असे स्पष्ट केले. करोना व्हायरसवर प्रतिबंध करण्यासाठी आपण एकत्रपणे लढण्याची गरज आहे. भारतात करोना व्हायरसचे दोन रूग्ण पॉझिटिव्ह आढळल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी हे आवाहन केले. जगभरात आतापर्यंत तीन हजार रूग्णांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलेल्या माहितीमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या टीप्स शेअर करण्यात आल्या आहेत. या टीप्स छोट्या असल्या तरीही स्वयंसुरक्षेसाठी महत्वपुर्ण आहेत असे ट्विट त्यांनी केले आहे.
देशात वेगवेगळी मंत्रालये तसेच राज्यांकडून कोरोना व्हायरसचा प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

- Advertisement -

नोवेल करोनाव्हायरस (COVID19) च्या प्रतिबंधासाठीचे उपाय 

– तुमचे हात नियमितपणे स्वच्छ करा
– गर्दीची ठिकाणे टाळा
– तुमचे डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा
– शिंकताना तसेच खोकताना तुमचे तोंड पुर्णपणे झाका, तसेच टिश्यूचा वापर करा
– तुमच्या आरोग्य सल्लागाराकडून वेळोवेळी या व्हायरसची माहिती घेत रहा
– मदतीसाठी +91-11-23978046

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की केंद्र सरकारमार्फत विविध राज्यांमधील आरोग्य मंत्रालये तसेच राज्य सरकार हे चर्चा करत आहे. विविध मंत्रालये आणि राज्य सरकार एकत्रितपणे करोना व्हायरससाठी स्क्रिनिंगचे काम करत आहेत. तसेच लोकांना योग्य असे वैद्यकीय उपचार देत आहेत असेही त्यांनी ट्विटमध्ये त्यांनी नमुद केले आहे. दिल्लीमध्ये करोना व्हायरसचे रूग्ण आढळल्याने आतापर्यंत दोन शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे दोन रूग्ण भारतात विमान सेवेचा वापर करून आले आहेत त्या विमान सेवेतील कर्मचाऱ्यांनाही १४ दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -