घरमुंबईकोरोनाने चुकवली मोदींची इंटरनॅशनल फ्लाईट

कोरोनाने चुकवली मोदींची इंटरनॅशनल फ्लाईट

Subscribe

२०२० या संपुर्ण वर्षात एकही परदेश दौरा नाही

नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यापासून २०२० हे पहिलेच असे वर्ष आहे, ज्या वर्षात पंतप्रधानांनी एकही परदेश दौरा केलेला नाही. पंतप्रधान कार्यालयाच्या माहितीनुसार २२ नोव्हेंबरपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकही परदेश दौरा केलेला नाही. तसेच या वर्षातल्या उरलेल्या दिवसातही त्यांचा कोणताही नियोजित परदेश दौरा नाही. या वर्षात सुरू झालेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पंतप्रधानांचे परदेश दौऱेही थंडावले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेवटचा दौरा हा ब्राझील येथे नोव्हेंबर २०१९ रोजी केला होता. पंतप्रधान परदेशात गेले नसले तरीही त्यांनी भारतातच अनेक राज्यांना भेटी दिल्या आहेत. त्यामध्ये नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी चारवेळा बिहारला दौरे केले होते. त्याआधी उत्तर प्रदेशातील अयोध्या ते राम जन्मभूमीच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. कोरोनाच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संपुर्ण वर्षात जॅम पॅक असे आंतरराष्ट्रीय दौरे होत होते. पंतप्रधान कार्यालयाच्या माहितीनुसार मोदी यांनी १५ जून २०१४ ते नोव्हेंबर २०१९ या कालावधीत एकुण ९६ देशांना भेटी दिल्या.

- Advertisement -

पंतप्रधानांचे वर्षनिहाय आंतरराष्ट्रीय दौरे

वर्ष दौरा    केलेले देश
२०१४       ८
२०१५       २३
२०१६       १७
२०१७       १४
२०१८       २०
२०१९       १४


 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -