Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी सीएसएमटी स्थानक कात टाकणार; पंतप्रधान मोदी करणार पुनर्विकास प्रकल्पाचे उद्घाटन

सीएसएमटी स्थानक कात टाकणार; पंतप्रधान मोदी करणार पुनर्विकास प्रकल्पाचे उद्घाटन

Subscribe

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (19 जानेवारी 2023) मुंबई दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी उद्या विविध विकास कामांचे उद्घाटन करणार आहेत. विशेष म्हणजे दक्षिण मुंबईतील सर्वात महत्त्वाच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सीएसएमटीच्या (CSMT) पुनर्विकास प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (19 जानेवारी 2023) मुंबई दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी उद्या विविध विकास कामांचे उद्घाटन करणार आहेत. विशेष म्हणजे मध्य रेल्वेच्या सर्वात महत्त्वाच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सीएसएमटीच्या (CSMT) पुनर्विकास प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माहिती दिली आहे. (pm narendra modi to inaugurate csmt redevelopment project on january 19 information of dcm devendra fadnavis)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटवरून माहिती दिली. “आयकॉनिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसबद्दल आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रेल्वे प्रवाशांचा प्रवास आरामदायी, सोयीस्कर आणि दर्जेदार बनवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पुनर्विकास प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत. या प्रकल्पांतर्गत सीएसएमटी आणखी भव्य आणि अत्याधुनिक सुविधांसह नव्या रूपात येईल”, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी सीएसएमटीच्या पुनर्विकास प्रकल्पाची उद्या पायाभरणी करणार आहेत. या प्रकल्पांतर्गत रेल्वे स्थानकाचे रुपडे पालटणार आहे. या प्रकल्पामध्ये येणाऱ्या आणि जाणाऱ्या ठिकाणांचे विभाजन, अपंगांसाठी अनुकूल स्थानक, प्रवाशांसाठी उत्तम सेवा, कार्यक्षम इमारत आणि 1930 मध्ये बांधलेल्या हेरिटेज साइटचा जीर्णोद्धार करण्याचा समावेश आहे. सीएसएमटी पुनर्विकास प्रकल्प 18,000 कोटी रुपयांचा असून, केंद्रीय मंत्रिमंडळाची या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे.

या प्रकल्पासाठी पुढील महिन्यात बोली लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच या प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान, मुंबई हेरिटेज संवर्धन समितीने सीएसएमटी स्थानकाच्या पुनरुज्जीवनासाठी रेल्वे मंत्रालयाच्या योजनेलाही मान्यता दिली आहे, अशी माहिती मिळाली आहे.


- Advertisement -

हेही वाचा – अर्थ मंत्रालयातील हेरगिरी नेटवर्कचा पर्दाफाश, एकाला अटक

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -