RSS कार्यालये उडवण्याची धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात, तीन भाषेत धमकीचे मेसेज

Police arrested a man who Threatening blow up with bombs of Rashtriya Swayamsevak Sangh office

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. राज मोहम्मद असे धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव असून तमिळनाडूतील पुडुकुडी येथून त्याला ताब्यात घेण्यात आले. उत्तर प्रदेशातील लखनऊ आणि कर्नाटकसह आरएसएसची 6 कार्यालये बॉम्बने उडवून देण्याची धमकी मोहम्मद राजने व्हॉटसअॅपवरून दिली होती.

आरोपी वापरत होता विदेशी नंबर – 

मोहम्मदने विदेशी नंबरवरून लखनऊ आणि उन्नावमधील नवाबगंज येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) कार्यालया बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. हा मेसेज मोहम्मदने अलीगंज येथे राहणाऱ्या डॉ नीळकंठ मणी पुजारींना व्हॉटसअॅपवर पाठवला होता. या धमकीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला होता.

तीन भाषेत धमकीचे मेसेज –

उत्तरप्रदेश आणि कर्नाटकसह 6 ठिकाणची आरएसएस (RSS) कार्यालय उडवून देण्याची धमकी मोहम्मद ने दिली होती. हिंदी, इंग्रजी आणि कन्नड भाषेत हे धमकीचे मेसेज पाठवले होते. धमकीचे मेसेज पाठवणाऱ्या मोहम्मदला तमिळनाडू पोलिसांनी अटक केली असून, उत्तर प्रदेश पोलीस त्याला ताब्यात घेण्याच्या तयारीत आहेत. Police arrested a man who Threatening blow up with bombs of Rashtriya Swayamsevak Sangh office