घरमुंबईविमा कंपन्यांना गंडा - भामट्यांची अनोखी शक्कल

विमा कंपन्यांना गंडा – भामट्यांची अनोखी शक्कल

Subscribe

जिवंत व्यक्तीचे खोटे मृत्यू प्रमाणपत्र बनवून विमा कंपन्यांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या टोळीचा कल्याण क्राईम ब्रांचने पर्दाफाश करत सात जणांना अटक केली आहे.

जिवंत व्यक्तीचे खोटे मृत्यू प्रमाणपत्र बनवून विमा कंपन्यांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या टोळीचा कल्याण क्राईम ब्रांचने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली असून या आरोपीमध्ये दोन डॉक्टरांचा देखील समावेश आहे. चंद्रकांत शिंदे, तेजपाल मेह्ररोल, डॉ. अब्दुल सिद्धिकी, डॉ. इम्रान सिद्धिकी, चंद्रशेखर शिंदे, नारायण शिंदे आणि लक्ष्मी शिंदे अशी अटक आरोपींची नाव असून त्यांचा एक साथीदार फरार असल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

अशी लढवली शक्कल

ठाणे महानगरपालिका मुंब्रा आरोग्य विभाग येथून मृत्यूचे खोटे प्रमाणपत्र काढून त्या आधारे विमा कंपन्यांकडून विम्याचे लाखो रुपये घेत कंपन्यांची फसवणूक केल्याची तक्रार कल्याण गुन्हे अन्वेषण विभागला मिळाली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने गंडा घालण्यासाठी एक टोळीच कार्यरत असल्याचा संशय पोलिसांना आल्याने त्या दृष्टीने कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने शोध घेण्यास सुरुवात केली. कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली सहय्यक पोलीस निरीक्षक संतोष शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक मारुती दिघे, शरद पंजे, हवालदार घोलप आणि त्यांच्या पथकाने तपास सुरु करत कल्याण पूर्व येथे राहणाऱ्या चंद्रकांत शिंदे याला अटक केली आहे.

- Advertisement -

विमा कंपन्यांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

आरोपी चंद्रकांत शिंदे त्याची चौकशी केली असता, ठाणे महानगरपालिकेच्या मुंब्रा येथील स्मशानभूमीत काम करणारा तेजपाल मेहरोल याने त्याच्या ओळखीच्या मुंब्रा येथील डॉक्टर अब्दुल सिद्धिकी आणि इम्रान सिद्धिकी यांच्याच्याशी संपर्क साधत त्यांच्याकडून मृत्यूप्रमाणपत्र तयार करुन घेतले. आरोपी चंद्रकांत यांनी १० जिवंत व्यक्तीचे आणि आंध्रप्रदेश येथे मयत झालेल्या ३ व्यक्तींचे खोटे मृत्यू दाखवून त्यांनी कट रचला. तसेच आपोरी डॉक्टरांनी ठाणे महानगरपालिकेच्या मुंब्रा येथील आरोग्य विभागाकडून मृत्यूचे खोटे प्रमाणपत्र काढून चंद्रशेखरला दिले. या बनावट मृत्यू प्रमाणपत्रांच्या सहाय्याने चंद्रशेखर शिंदे , नारायण शिंदे, लक्ष्मी शिंदे यांनी दोन विमा कंपन्यांची फसवणूक करत विम्याच्या दाव्याचे ८१ लाख रुपये मिळवले होते तर अजून ५५ लाख मिळवण्याच्या प्रयत्नात होते. मात्र तोपर्यंत या टोळीचा भांडाफोड करण्यास कल्याण क्राईम ब्रांचला यश आले. दरम्यान चंद्रकांत शिंदे, चंद्रशेखर शिंदे, नारायण शिंदे, लक्ष्मी शिंदे हे सगळे एकमेकांचे नातेवाईक असून लक्ष्मी नारायण शिंदे हिला मयत दाखवून त्यांनी पुन्हा विमा कंपन्यांना गंडा घालण्याचा प्लॅन केला. मात्र कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने हा प्रयत्न हाणून पडत या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. तर त्याचा एक साथीदार पसार झाला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.


वाचा – लग्नाच्या भूलथापा देत महिलेला घातला ऑनलाइन गंडा

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -