घरमुंबईशेतकऱ्याचा 'मातोश्री'त घुसण्याचा प्रयत्न; पोलिसांनी घेतलं ताब्यात!

शेतकऱ्याचा ‘मातोश्री’त घुसण्याचा प्रयत्न; पोलिसांनी घेतलं ताब्यात!

Subscribe

कर्जामुळे हैराण झालेल्या एका शेतकऱ्याने आज सकाळी आपल्या लहान मुलीसह मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी घुसण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी हा शेतकरी आला होता. मात्र पोलिसांनी त्याला अडवून धक्काबुक्की केली असून त्याला पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे. तो शेतकरी आपल्या मुलीला घेऊन का मुख्यमंत्र्यांना भेटायला आला होता याची चौकशी सध्या पोलिस करत आहेत.

या शेतकऱ्याचं नाव अनिल देशमुख आहे. ते पनवेलहून मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायला आले होते. त्यांच्यासोबत त्यांची आठ वर्षाची मुलगीही होती.मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सकाळपासून मातोश्रीबाहेर उभं राहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट होत नाही, असं लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांना आतमध्ये जाऊ देण्याची विनंती केली. मात्र पोलिसांनी त्यांना आतमध्ये जाऊ देण्यास मज्जाव केला. त्यामुळे निराश झालेल्या देशमुख यांनी थेट मातोश्रीतच घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत पोलिसांनी देशमुख आणि त्यांच्या कन्येला धक्काबुक्की केली.

- Advertisement -

अनिल देशमुख गेले पाच दिवस वर्षा बंगला येथे व मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी जात होते. पण भेट होऊ न शकल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ते आले, भेट होणार नाही असे सांगितल्यावरही ते जागचे न हलल्यामुळे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या त्यांची पुढील चौकशी सुरू आहे अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक निखिल कापसे यांनी दिली.

यावेळी देशमुख यांच्यासोबत एक फाइलही होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी या कर्जासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयात अर्जही केला होता. त्यावर त्यांना मुख्यमंत्री कार्यालयातून पोचपावतीही देण्यात आली होती. तरीही त्यांची समस्या सुटली नव्हती. त्यामुळे निराश झालेल्या देशमुख यांनी आज थेट मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -