घरमुंबईमुंबईकरांना वापरता येणार ब्रॅंड 'मुंबई पोलीस', पोलीस आयुक्तांची घोषणा

मुंबईकरांना वापरता येणार ब्रॅंड ‘मुंबई पोलीस’, पोलीस आयुक्तांची घोषणा

Subscribe

मुंबई पोलीस आयुक्तपदाची सुत्रे स्विकारल्यानंतर संजय पांडे यांनी नागरिकांशी संवाद वाढवला आहे. त्यांनी सोशल मीडियावर येणाऱ्या तक्रारीकडे लक्ष देऊ त्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर संजय पांडे यांनी मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यासाठी वैयक्तिक मोबाईल नंबर सोशल मीडियावर शेअर केला होता. यामुळे नागरिक आपल्या समस्या त्याच्या पुढे माडू शकतात. आता मुंबई पोलिसांच्या माध्यमातून एका सामाजिक कार्यासाठीही पुढाकार घेण्यात आला आहे. त्याचाच भाग म्हणजे मुंबई पोलिसांच्या ब्रॅण्डने काही वस्तु या विक्रीसाठी उपलब्ध करून देणयात येणार आहेत. तसेच या वस्तुंच्या माध्यमातून येणाऱ्या पैशांचा वापर हा सामाजिक कार्यासाठी करण्यात येईल, अशी घोषणा संजय पांडे यांनी आपल्या फेसबुक वॉलवर केली आहे.

मुंबई पोलिसांचा ब्रॅण्ड वापरत एक नवीन योजनेची घोषणा पांडे यांनी केली आहे. यामध्ये त्यांनी मुंबईच्या नागरिकांसाठी काही वस्त्र बनवत आहोत. तसेच ते आम्ही शो रुममधून विक्री करून यामधून जेवढ निधी जमा होईल तो जनकल्याणासाठी वापरला जाईल, असे संजय पांडे यांनी फेसबुकवर स्पष्ट केले आहे. यामध्ये टोपी, जॉकेट, कप, बॉटल, टी-र्शट, परफ्यूम, शॉर्ट टी-र्शट हे सर्व शो रूममध्ये उपलब्ध होणार आहेत. हे मुंबई पोलीस ब्रॅंड या नावाने विकण्यात येणार आहे. यामधून जेवढा पैसा जमा होईल, तो सर्व कल्याणासाठी वापरला जाणार आहे.

- Advertisement -

पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी वाहतुकीच्या संदर्भासाठीही दोन उपक्रम राबवले होते. यामध्ये त्यांनी WrongSideDriving आणि Removekhatara हे नवे उपक्रम राबवले आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारी घेतल्या आणि यावर त्यांनी काही मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांना भेटून त्यांना रात्रीच्या बांधकामावर बंदीचा निर्णय जाहीर केला होता. मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी यशस्वीरित्या छापा टाकून बेकायदेशीर लॉटरीच्या तक्रारीवरही कारवाई केली होती.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -