घरमुंबईबहुमत चाचणीसाठी मुंबईत कडेकोट सुरक्षा

बहुमत चाचणीसाठी मुंबईत कडेकोट सुरक्षा

Subscribe

सीआरपीएफचे २ हजार जवान मुंबईत, आमदारांच्या सुरक्षेसाठी केंद्राचा मास्टर प्लान, ६ हजार ६१५ पोलिसांचा तगडा बंदोबस्त

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना बहुमत चाचणीला सामोरे जाण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी बंडखोर आमदार आज गोव्यातून मुंबईत येणार आहेत. मुंबई विमानतळावरुन बंडखोर आमदार विधानभवनात सुरक्षितपणे पोहोचण्यासाठी केंद्र सरकारने मास्टर प्लान आखला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निर्देशानुसार ३ विशेष विमानांद्वारे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे २ हजार जवान मुंबईत दाखल झाले आहेत. सोबत कायदा-सुव्यवस्था टिकवण्यासाठी मुंबई पोलिसांनी तयारी सुरू केली आहे. शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये, आमदारांवर हल्ला होऊ नये म्हणून सर्वच पोलिसांना बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे.

शहरात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून दक्षिण मुंबईतील जास्तीत जास्त पोलिसांना बंदोबस्तकामी ठेवण्यात आले आहे. त्यासाठी राज्य राखीव दलासह केंद्रीय सुरक्षेची मदत घेतली जाणार आहे. बंडखोर आमदार विमानतळाहून थेट विधान भवनात जाणार असल्याने या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

- Advertisement -

सहपोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त दर्जाचे २०हून अधिक आयपीएस अधिकारी, ४५ सहाय्यक पोलीस आयुक्त, २२५ पोलीस निरीक्षक, ७२५ सहाय्यक पोलीस निरीक्षक-पोलीस उपनिरीक्षक, २५०० पोलीस अंमलदार, लोकल पोलीस फोर्सचे १ हजार २५० पोलीस कर्मचारी, राज्य राखीव दलाच्या १०हून अधिक तुकड्या, ७५० अतिरिक्त पोलीस फोर्स तसेच केंद्रीय सुरक्षा पोलीस दलाचे दोन हजार फोर्स तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -