घरमुंबईआता पोलीस खात्यातही #Metoo चं वारं

आता पोलीस खात्यातही #Metoo चं वारं

Subscribe

दरम्यान, या घटनेमुळे जनतेच्या सुरक्षिततेसाठी सतर्क असणाऱ्या पोलिसांवरच प्रश्न उपस्थित राहिला आहे.

लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या #Metoo मोहिमेअंतर्गत, अनेक मोठ्या व्यक्तींवर आरोप लावण्यात आले. आता ‘मीटू’चं हे वादळ पोलीस खात्यातही पोहोचलं आहे. मुंबईतील आंबोली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकांवर लैंगिक शोषणाचा आरोप लावण्यात आला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीनेच हा आरोप केला आहे. पीडित महिला नाशिक येथील रहिवाशी आहे. पीडिता आणि आरोपी या दोघांच्या कुटुंबियांमध्ये परिचयाचे संबंध होते. याच गोष्टीचा गैरफायदा घेत पोलीस उपनिरीक्षकांनी माझं लैंगिक शोषण केल्याचा आरोप पीडित माहिलेने केला. दरम्यान, या घटनेमुळे जनतेच्या सुरक्षिततेसाठी सतर्क असणाऱ्या पोलिसांवरच प्रश्न उपस्थित राहिला आहे. जनता ज्यांच्याकडे आधार म्हणून पाहते ते पोलीसच जर अशाप्रकारे गैरवर्तन करणार असतील, तर नक्कीच ही बाब कुठेतरी खेदजनक आहे. मात्र, असं असलं तरी अद्याप संबंधित पोलीस उपायुक्तांवरचा आरोप सिद्ध न झाल्यामुळे त्यांना संशयित आरोपी म्हणून ग्राह्य धरण्यात आलं आहे.

घटना सविस्तर…

पीडित महिलेने नोंदवलेल्या तक्रारीनुसार, आरोपी उपनिरीक्षकाने आपल्यातल्या फोन संभाषणाचं रेकॉर्डिंग आणि मोबाईल क्लिप्स व्हायरल करेन, अशी धमकी देत बरेचदा माझं लैंगिक शोषण केलं. उपलब्ध माहितीनुसार पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत असून, आरोपी आणि पीडिता यांच्यामध्ये नेमकं काय संभाषण झालं? तसंच आरोपीने धमकीमध्ये उल्लेख केलेल्या व्हिडिओमध्ये नक्की काय आहे? याचा तपसा करत आहेत. दरम्यान, संशयित पोलीस उपनिरीक्षकावर ३६७ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -