घरताज्या घडामोडीतक्रारदाराची चौकशी करायला गेलो आणि पोलिसांनी पकडले

तक्रारदाराची चौकशी करायला गेलो आणि पोलिसांनी पकडले

Subscribe

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यात झालेल्या मारहाणी प्रकरणी तक्रारदाराची चौकशी करण्यासाठी निघालेले भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यात झालेल्या मारहाणी प्रकरणी तक्रारदाराची चौकशी करण्यासाठी निघालेले भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना मुलुंड येथील नवघर पोलीस ठाण्यात बसवण्यात आले आहे,अशी माहिती खुद्द किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटरवरुन दिली आहे.

- Advertisement -

याला भाजपाकडून विरोध

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या फेसबुक पोस्टवर आव्हाड यांच्या विरुद्ध कमेंट्स टाकणारे ठाण्यातील सिव्हिल इंजिनियर अनंत करमुसे यांना रविवारी त्यांच्या घरातून घेऊन आव्हाड यांच्या बंगल्यावर आणण्यात आले होते. बंगल्यातच करमुसे यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी वर्तक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या मारहाणीचा भाजपाकडून कडाडून विरोध करण्यात आला आहे.

भाजपचे नेते किरीट सोमैय्या पोलिसांच्या ताब्यात | BJP leader Kirit Somaiya in police custody

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यात झालेल्या मारहाणीप्रकरणी तक्रारदाराची चौकशी करण्यासाठी निघालेले भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना मुलुंड येथील नवघर पोलीस ठाण्यात बसवण्यात आले आहे.

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 8, 2020

- Advertisement -

दरम्यान, बुधवारी सकाळी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे तक्रारदार अनंत करमुसे यांना भेटण्यासाठी ठाणे घोडबंदर येथे जाण्यासाठी निघाले असता त्यांना निलम नगर मुलुंड पूर्व येथून नवघर पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात बसवून ठेवले आहे.


हेही वाचा – चीनमध्ये नव्या कोरोनाचा धूमाकूळ


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -