घरमुंबईजनतेचे रक्षण करणारे पोलीसच धोक्याच्या घरात

जनतेचे रक्षण करणारे पोलीसच धोक्याच्या घरात

Subscribe

ठाणे ग्रामीण पोलिसांच्या शहापूर तालुक्यातील बहुतांश शासकीय निवासस्थानाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे जनतेचे रक्षण करणार्‍या पोलीस आणि त्यांच्या कुटुंबाला धोक्याच्या घरात रहावे लागत आहे. राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे ही वेळ पोलीस कुटुंबीयांवर आली आहे.

पोलिसांच्या सरकारी निवासस्थानाची अवस्था वाईट आहे. जीर्ण झालेल्या भिंती, खिडक्या, दरवाजे तुटलेले, मोडकळीस आलेले छप्पर, फुटलेल्या लाद्या, वसाहतीमध्ये वाढलेल्या गवत, कचर्‍यामुळे उंदीर घुशींचा वावर अशा परिस्थितीत पोलीस कुटुंबांना रहावे लागत आहे.

- Advertisement -

शहापूर, किन्हवली, वासिंद येथे पोलिसांच्या निवासस्थांनाचा प्रश्न कायम आहे. शहापूर शहराच्या पोलीस ठाण्याच्या लगत असलेल्या पोलीस कर्मचारी निवासी चाळीची देखभाल दुरुस्ती करण्याची गरज आहे. घरांची पडझड झाल्याने या वसाहतीत केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या पोलिसांची कुटुंब जीव मुठीत धरून रहात आहेत.

निवासी चाळींची दुरवस्था पाहता चाळीत अनेक पोलीस कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांनी पोलीस लाईनमधील रूम खाली करुन अन्य ठिकाणी भाड्याने घरे घेतली आहेत. शहापूर सारखीच स्थिती किन्हवली पोलीस ठाण्याच्या निवासी चाळींची झाल्याचे चित्र आहे. एकूण 93 गावांची कायदा आणी सुव्यवस्था राखण्याची महत्त्वाची जबाबदारी असणार्‍या किन्हवली पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांकरिता असलेली निवासी चाळीची दुर्दशा झाली आहे.

- Advertisement -

येथील सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या निवासस्थानांचीदेखील प्रचंड पडझड झाली आहे. यामुळे येथे राहणे धोक्याचे वाटत असल्याने किन्हवली सहाय्यक पोलीस निरीक्षक हे भाड्याने घर घेऊन राहत आहेत, तर राहायला निवासस्थान नसल्याने अन्य पोलीस कर्मचार्‍यांनादेखील भाड्याने घर घेऊन रहावे लागत आहे. तालुक्यातील वासिंद येथे पोलीस ठाणे मंजूर करण्यात आले आहे. मात्र, येथील जागेवर नवीन पोलीस ठाण्याच्या पक्क्या इमारतीचे बांधकाम व पोलीस कर्मचार्‍यांना राहण्यासाठी निवासस्थाने बांधली गेली नाहीत. एकूण 33 गावे आणि 3 पाड्यांच्या कायदा, सुव्यवस्थेची जबाबदारी वासिंद पोलीस ठाण्यावर आहे. वासिंद येथे तर पोलीस ठाण्याची इमारत, पोलिसांसाठी निवासस्थानेच उभारण्यात आलेली नाहीत, तर शहापूर, किन्हवली पोलीस कर्मचार्‍यांच्या निवासी चाळींची दुरुस्ती अनेक वर्षांपासून करण्यात आलेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -