घरमुंबईपोलीस निरीक्षकच ड्रग्ज विक्रीत

पोलीस निरीक्षकच ड्रग्ज विक्रीत

Subscribe

कुविख्यात ड्रग्स माफियांशी नालासोपारातील एका पोलीस अधिकार्‍याचा संबंध उघड झाला असून हा अधिकारी ड्रग्स विक्रीतही सहभागी असल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ड्रग्स माफिया शाम मौहम्मद रफीक अन्सारी आणि मुश्ताक सहीद खान यांना अंमली पदार्थ विक्री प्रकरणी नालासोपारा पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यांची सखोल चौकशी केली असता पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांचा त्यांच्याशी सातत्याने संपर्क असल्याचे मोबाईलच्या कॉल हिस्ट्रीतून दिसून आले. तसेच महेश चव्हाण याचाही अन्सारी सोबत ड्रग्स विक्रीत सहभाग असल्याचे मोबाईलवरील संभाषणातून उघड झाले. त्यामुळे चव्हाणवर अमली पदार्थ विक्री कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्याचे कळल्यावर चव्हाण फरार झाला आहे. पोलिसांचा ड्रग्स माफियांबरोबर असलेला संबंध उघड झाल्यामुळे नालासोपारा पोलीस खजील झाले असून या प्रकरणी अधिक माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -