…आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला रडू कोसळले

आपल्या सहकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला रडू कोसळले.

police officers burst into tears when they heard that corona has lost 3 colleagues
...आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला रडू कोसळले

मुंबईत कोरोना विषाणूने विळखा अधिकच घट्ट केला आहे. गेल्या ४८ तासांत मुंबईत कोरोना विषाणूने तीन पोलिसांचा बळी घेतला आहे. ५६ वर्षाचे कुर्ला वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार यांचे कोरोनामुळे निधन झाले. तर संरक्षण शाखेतील आणि वाकोला पोलीस स्टेशनमधील पोलिसांचा रविवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, कोरोमुळे पोलीस दलातील तीन सहकारी गमावल्याचे ऐकून एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला रडू कोसळले आहे.

तर मुंब्रा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कोरोनावर मात करत विजय मिळवला आहे. या पोलीस अधिकाऱ्यावर मुंबईच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरु होते. आज त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, नाशिक येथे ते आपल्या गावी जात असताना ठाण्यातील आनंद नगर टोल नाक्याजवळ ठाणे पोलिसांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत टाळ्या वाजवत त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पोलीस अधिकारी आपल्या गावी नाशिकला रवाना झाले.

५० लाखांची मदत

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या परिवाला प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. तसेच परिवारातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.


हेही वाचा – पुण्यातील मुस्लिम कुटुबांची कोरोनाविरोधात लढाई, आई-वडील-मुलगा ऑनफिल्ड