पोलीस भरतीतील बेपर्वाईने नायगाववासीयांच्या आरोग्याला धोका, शेजारी प्रसुतीगृह असूनही दुर्लक्ष

नुकतीच पोलीस भरती सुरु झाली आहे. नायगाव येथे महिला गटाची शारीरिक चाचणी सुरु आहे. हुत्मामा मैदानात ही चाचणी सुरु आहे. राज्यातील विविध भागातून येथे मुली शारीरिक चाचणीसाठी येत आहेत. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून यावेळेस मैदानात मोबाईल टॉयलेट लावण्यात आले आहेत. या मैदानाच्या शेजारीच प्रसुतीगृहाची इमारत आहे. एकच भिंत मैदान आणि प्रसुतीगृहाच्यामध्ये आहे. या भितीं शेजारीच हे मोबाईल टॉयलेट आहेत.

मुंबईः पोलीस खात्यात सध्या मेगाभरती सुरु आहे. पोलीस भरतीची शारीरिक चाचणी दादर, नायगाव येथे सुरु आहे. यासाठी येथील हुत्मामा मैदानात मोबाईल टॉयलेट आणण्यात आले आहे. या मोबाईल टॉयलटेची देखभाल व्यवस्थित केली जात नाही. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे या मैदानाशेजारी महापालिकेचे त्यागमुर्ती माता रमाई प्रसुतीगृह आहे. या दुर्गंधीचा त्रास या प्रसुतीगृहाला होत आहे. येथे नुकतीच प्रसुती झालेल्या महिला आहेत. तरीही पोलीस प्रशान या दुर्गंधीकडे काणाडोळाकडून बसले आहे. स्थानिक नागरिक व रुग्णालय प्रशासन या दुर्गंधीने त्रस्त झाले आहे. दुर्गंधीमुळे रोगराई पसरण्याची भीती आहे.

नुकतीच पोलीस भरती सुरु झाली आहे. नायगाव येथे महिला गटाची शारीरिक चाचणी सुरु आहे. हुत्मामा मैदानात ही चाचणी सुरु आहे. राज्यातील विविध भागातून येथे मुली शारीरिक चाचणीसाठी येत आहेत. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मैदानात मोबाईल टॉयलेट लावण्यात आले आहेत. या मैदानाच्या शेजारीच प्रसुतीगृहाची इमारत आहे. एकच भिंत मैदान आणि प्रसुतीगृहाच्यामध्ये आहे. या भिंती शेजारीच हे मोबाईल टॉयलेट आहेत. या मोबाईल टॉयलेटचा वापर दिवसाला किमान चारशे ते पाचशे मुली करत असतील. त्यामुळे या मोबाईल टॉयलेटची देखभाल करणे आवश्यक आहे. मात्र पोलीस प्रशासन या मोबाईल टॉयलेटची देखभाल योग्य प्रकारे करत नाहीत. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली आहे. येथील रस्त्यावरुन जाताना तोंडावर रुमाल ठेवून जावे लागत आहे.

तसेच शेजारीच असलेल्या प्रसुतीगृहात नुकतेच जन्मलेले बाळ व गरोदर महिलाही आहेत. या दुर्गंधीचा त्रास त्यांना व या प्रसुतीगृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना होत आहे. या त्रासाची जाणीव प्रसुतिगृहातील अधिकाऱ्यांनी भोईवाडा पोलिसांना करुन दिली. तरीही अजून काही ठोस उपाय योजना करण्यात आलेली नाही. नागरिकही या दुर्गंधीने त्रस्त आहेत. येथे गस्त घालत असलेल्या पोलिसांना या दुर्गंधीची माहिती आहे. पण ते काहीच करत नसल्याचा आरोप स्थानिक करत आहेत.

आमच्या प्रसुतिगृहात तान्ही बाळं आहेत. उपाचारासाठी गरोदर महिला दाखल आहेत. याच प्रसुतिगृहात पालिकेचा दवाखाना आहे. येथेच पालिका कर्माचाऱ्यांचे स्टाफ क्वॉटर्स आहे. या दुर्गंधीचा त्रास खूप होता. भोईवाडा पोलिसांना याची माहिती दिली आहे. पण ते काहीच करत नाही, असे प्रसुतिगृहाच्या अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

आम्हाला या दुर्गंधीचा खूप त्रास होतो. येथून जाताना तोंडावर रुमाल ठेवून जावे लागत आहे. आमचा पोलीस भरतीला किंवा मोबाईल टॉयलेटला विरोध नाही. पण त्याची देखभाल पोलिसांनी करायला हवी. तेथे स्वच्छता ठेवायला हवी. येथे गस्त घालणारे पोलीसही या समस्यकडे दुर्लक्ष करत आहेत. या दुर्गंधीमुळे परिसरात रोगराई पसरली. कोणाच्या जीवाला धोका निर्माण झाला तर याला सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार असेल. या दुर्गंधीवर तोडगा काढला नाही तर पोलीस प्रशासनाविरोधात आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते व राज्य शासनाचा समाज उत्थान पुरस्कार प्राप्त शशिकांत बर्वे यांनी दिला आहे.