घरCORONA UPDATEबघा! करोनाला रोखणारे पोलीस कसा करतायंत प्रवास

बघा! करोनाला रोखणारे पोलीस कसा करतायंत प्रवास

Subscribe

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पोलिसांची वाहतूक करणाऱ्या गाडीचे दोन फोटो शेअर केले आहेत. यामध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर अहोरात्र ड्युटी बजावणाऱ्या पोलिसांची ये-जा गाडीतून दाटीवाटीने होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

करोनाचे संकट सर्वत्र पसरले असताना पोलीस यंत्रणा मात्र रस्त्यावर अहोरात्र काम करत आहे. रस्त्यावर तासनतास उभे राहून ड्युटी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना साधी वाहतूक व्यवस्थाही नीट नाही. अक्षरश: गाडीत कोंबून दाटीवाटीने ते प्रवास करतानाचे फोटो सध्या निदर्शनास येत आहेत. यासंदर्भात तातडीने उपाययोजना करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे.

राज्य सरकार का खेळतेय पोलिसांच्या जीवाशी

आपल्यापर्यंत आलेले हे फोटो आणि त्यातील स्थिती खूप वाईट आहे. पोलिसांनासुद्धा कुटुंब आहे आणि त्यांनाही करोना रोगाची भीती आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांना ते फोटो पाठवले असल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितले. त्यांना योग्य त्या उपाययोजना राबवण्यासाठी सूचनाही यावेळी करण्यात आल्याचे ते म्हणाले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्वरित यासंबंधित आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस यांना घडत असलेल्या प्रकारावर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहितीही दरेकर यांनी दिली. करोनाच्या या महाकाय संकंटात सध्या पोलीस जनतेची युद्धपातळीवर अहोरात्र सेवा करत आहे. त्यामुळे पोलिसांचा असा असुरक्षित प्रवास होत असेल तर हे फार धक्कादायक आहे. संकटाच्या या काळात जनेतेच रक्षकाकडे दुर्लक्ष होत असेल तर दुर्दैवी आहे. ही स्थिती खूप वाईट आहे. सध्या पोलिसांना असे घेऊन जात आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात नाही, हे फार खेदजनक आहे. राज्य सरकार ही पोलिसांच्या जीवाशी खेळत असल्याचे चित्र यामुळे पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्वरित या प्रकरणाचा शोध घ्या आणि योग्य त्या उपाययोजना राबवा, अशी सूचना गृहमंत्र्यांना करण्यात आली असल्याचेही दरेकर यांनी सांगितले.

- Advertisement -
police in bus
दाटीवाटीने प्रवास करताना पोलीस

गृहमंत्री अनिल देशमुख, मुख्यमंत्री बघताय ना…!

करोना व्हायरस या अतिशय नवीन आरोग्यासंबंधीत संकटांशी कुठलाही पुर्वानुभव नसताना राज्याचे पोलीस दल लढत आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सध्या आपल्याकडे घरी बसणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे हेच दोन उपाय आहेत. अशा वेळी राज्याचे पोलीस दल अपुऱ्या साधनांनिशी रस्त्यावर पहारा देत आहे. मात्र गृहखात्यातर्फे पोलिसांना पुरवण्यात आलेली वाहने तोकडी आहेत. एकाच वाहनात क्षमतेपेक्षा जास्त पोलिसांची वाहतूक केली जाते. या पोलिसांना मास्क तसेच ग्लोव्हज्ही देण्यात आलेले नाहीत. करोनाशी लढायचे असेल तर पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट लागतात. मात्र, या कशाचाच पुरवठा पोलिसांना झालेला नाही. मुंबईच्या लगतच्या परिसरातून मोठ्या प्रमांणावर पोलीस मुंबंईत येत असतात. त्यांच्यासाठी सोशल डिस्टन्स पाळता येईल इतक्या गाड्या उपलब्ध केल्या पाहिजेत, अशी मागणी प्रविण दरेकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. पोलिसांची वाहतूक करणाऱ्या गाडीचे फोटो मिळताच प्रविण दरेकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दूरध्वनी करून तात्काळ कारवाईची मागणी केली.

pravin darekar
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आदी ठाणे ग्रामीण आणि शहरातील पोलिसांची वाहतूक व्यवस्था तसेच पालघर, मुंबई शहरातील पोलिसांची ने-आण सुलभ करणे आवश्यक आहे. त्यांनाही करोना व्हायरस बाधित होऊ शकतो. त्यांनाही कुटुंब परिवार आहे. तरी कृपया एमएमआरडीए क्षेत्रात पोलिसांसाठी ड्युटीवर जाण्यासाठी तसेच घरी पोहोचण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग करणे आवश्यक वाटते, असे ठाम मत विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

कोरोनाविरोधात लढाईसाठी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना ३ महिने मुदतवाढ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -