घरमुंबईपोलीस ठाणे गैरसोयीचे, रहिवाशांची फरफट!

पोलीस ठाणे गैरसोयीचे, रहिवाशांची फरफट!

Subscribe

डोंबिवली पूर्वेतील रामचंद्र नगर परिसर हा जवळच्या पोलीस ठाण्याला न जोडता तब्बल ३ ते ४ किमी अंतरावर असलेल्या पोलीस ठाण्याला जोडला गेल्याने स्थानिक रहिवाशांची फरफट होत आहे. आम्हाला जवळचे पोलीस ठाणे द्या, या मागणीला पोलिसांकडून नकार दर्शविल्याने रहिवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.डोंबिवली पश्चिमेला विष्णुनगर तर पूर्वेला रामनगर आणि मानपाडा अशी तीनच पोलीस ठाणी होती. मात्र रामनगर पोलीस ठाण्याची हद्द वाढल्याने त्याचे विभाजन होऊन पाच-सहा वर्षांपूर्वी टिळकनगर पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे डोंबिवलीत चार पोलीस ठाणी झाली आहेत.

मात्र रामचंद्रनगर परिसरातील हद्दीवरून रहिवासी संघाने पोलीस उपायुक्तांना साकडे घातले आहे. रामनगर व टिळकनगर पोलीस ठाण्यापासून जवळचा असलेला रामचंद्रनगर हा विभाग मानपाडा पोलीस ठाण्याला जोडला गेल्याने रहिवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. इथल्या रहिवाशांना टिळकनगर व रामनगर ही दोन पोलीस ठाणी जवळच आहेत. मात्र मानपाडा पोलीस ठाणे हे सुमारे ४ किमी अंतरावर आहे. त्यामुळे रहिवाशांसाठी गैरसोयीचे ठरत आहे. हा परिसर टिळकनगर व रामनगरला जोडण्यात यावा यासाठी इथल्या रहिवासी संघांकडून अनेक वर्षांपासून पोलीस दरबारी पत्रव्यवहार केला आहे. मात्र अजूनही त्यांची मागणी मान्य झालेली नाही. त्यामुळे रहिवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

- Advertisement -

रामचंद्र नगर परिसर हा टिळकनगर आणि रामनगर पोलीस ठाण्याच्या जवळच आहे. मानपाडा पोलीस ठाणे हे चार किमी अंतरावर आहे. त्याठिकाणी जाण्यासाठी रिक्षाही मिळत नाही. तसेच आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे आम्हाला जवळच्या पोलीस ठाण्याला जोडावे, अशी मागणी आम्ही केली होती. पण आमची मागणी दप्तरी दाखल केली आहे.
-डॉ. आनंद हर्डीकर, स्थानिक रहिवाशी.

काय आहे पोलिसांचे म्हणणे
सदर भागात असलेल्या नाल्याची पलिकडील बाजू मानपाडा हद्दीत तर नाल्याच्या अलिकडे असलेली बाजू ही टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. रामचंद्रनगर हा परिसर मानपाडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात आहे. त्यामुळे आपला ई-मेल दप्तरी दाखल करण्यात येत आहे, असे टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सावंत यांनी कळवले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -