Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई 'माझ्याकडेपण भाजप नेत्यांच्यी डझनभर 'एक्स्ट्रा' प्रकरणं'

‘माझ्याकडेपण भाजप नेत्यांच्यी डझनभर ‘एक्स्ट्रा’ प्रकरणं’

पूजा चव्हाण प्रकरणामुळे संजय राठोडच नाही तर शिवसेनाही अडचणीत

Related Story

- Advertisement -

पूजा चव्हाण प्रकरणामुळे संजय राठोडच नाही तर शिवसेनाही अडचणीत आली आहे. याचपार्श्वभूमीवर राठोड यांनी मातोश्रीवर राजीनामा पाठवल्याची चर्चा आहे. यावर मिडियाबरोबर बोलताना वडेट्टीवार यांनी भाजपवर निशाणा साधला. “संजय राठोड यांचा राजीनामा हे मीडिया ट्रायल आहे. भाजप नेत्यांची महिलांबाबतीच डझनभर प्रकरणे मलाही सांगता येतील पण भाजपा नेत्यांसाठी नैतिकता लागू पडत नाही, तिथे नैतिकता संपुष्टात येते. लवकरच या प्रकरणातील सत्य बाहेर येईल,” असं म्हणत वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाबाबत मांडलेली भूमिका घेऊन योग्य असल्याचे म्हटले आहे.

टीक टॉकस्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्यापासून विरोधक आ्क्रमक झाले आहेत. राठोड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यापासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजप सातत्याने करत आहे. यामुळे आपत्ती व पुनर्वसन विभाग मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपच्या मंत्र्यांना प्रत्युत्तर देताना त्यांचीही ‘एक्स्ट्रा’ प्रकरण आपल्याकडे आहेत, असा दावा करत एक प्रकारे विरोधकांना इशाराच दिला आहे तर राठोड यांची पाठराखण केली आहे.

- Advertisement -

एकीकडे भाजपकडून राठोड यांच्यावर कारवाई करण्याचा दबाव असल्याने शिवसेनेतही या प्रकरणावरून दोन गट पडल्याचे वृत्त आहे. तसेच या प्रकरणात विरोधकांकडून सतत दबाव येत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही डोकेदुखी वाढली आहे. यामुळे मुख्यमंत्री काय बोलतात याकडे सगळ्यांचेच लक्ष आहे. तसेच शिवसेनेतील काही नेतेही राठोड यांनी राजीनामा द्यायला हवा अशी दबक्या आवाजात चर्चा करत आहेत. राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनीही राठोड आमचे सहकारी मित्र असल्याचे सांगत मुख्यमंत्रीच यावर योग्य भूमिका मांडतील असे सांगितले आहे.

- Advertisement -