घरताज्या घडामोडीपूजा चव्हाण, आत्महत्या, राजकारण

पूजा चव्हाण, आत्महत्या, राजकारण

Subscribe

सध्या बीड मधील पूजा चव्हाण या तरुणीच्या पुणे य़ेथील आत्महत्या प्रकरणाची सर्वत्र चर्चा आहे. त्याचबरोबर पूजेच्या हत्येचा संबंध महाविकास आघाडीतील एका मंत्र्यासोबत असल्याच्या ११ ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्या आहेत. यामुळे विरोधक आक्रमक झाले असून याप्रकरणावरून राजकारणही चांगलेच तापले आहे.

प्रकरण नक्की आहे तरी काय?

- Advertisement -

पूजा मूळची परळी वैजनाथ येथील होती. ती टीक टॉक स्टारही होती. पण काही दिवसांपूर्वी ती पुण्यात इंग्लीश स्पीकींगचा कोर्स करण्यासाठी आली होती. येथील वानवडीमधील हेवन पार्क सोसायटीत ती भाऊ व मित्राबरोबर राहत होती. ८ फेब्रुवारीला तिने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पोलिसांनी अपघाती मृत्यू म्हणून त्याची नोंद केली.

पण आता विदर्भातील एका मंत्र्याचा पूजाबरोबर संबंध असल्याचे समोर आले आहे. पूजाबद्दल एका कर्मचाऱ्याशी बोलतानाची या मंत्र्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यात पूजा आत्मह्त्येचे विचार करत असल्याचं हा कर्मचारी संबंधित मंत्र्याला सांगत आहे. यावर मंत्री तिच्याकडून मोबाईल घेण्याबरोबरच तिची समजूत काढण्यासही तिला सांगत आहे.

- Advertisement -

दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी असे पत्र महासंचालकांना पाठवल्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टि्वट केले आहे. तसेच या ऑडिओ क्लिपमधील संभाषण हे बंजारा भाषेत आहे. पूजा बंजारा समाजातील असल्याने या समाजात अस्वस्थतेचे वातावरण असल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

 

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -