Monday, February 15, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी राज्याच्या मुख्यमंत्री उद्धवजी आहेत, पूजाच्या दोषींवर कारवाई होणारच - नीलम गोऱ्हे

राज्याच्या मुख्यमंत्री उद्धवजी आहेत, पूजाच्या दोषींवर कारवाई होणारच – नीलम गोऱ्हे

Related Story

- Advertisement -

राज्याच्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पूजा चव्हाण प्रकरणामध्ये महत्वाची अशी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या देशात न्यायसंस्था आहे. या न्यायसंस्थेमार्फत योग्य निर्णय घेतला जाईल. आरोपांमध्ये सखोल चौकशी होत नाही तोवर निष्कर्षापर्यंत जाणे योग्य होणार नाही असे त्या म्हणाल्या. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे आहेत. त्यामुळे वस्तुस्थितीवर सरकार नक्कीच पोहचेल असे नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई होईलच असेही त्यांनी स्पष्ट केले. पूजा चव्हाणवर आरोप करणारे हे पूजाच्या कुटुंबीयांना का भेटले नाहीत ? असाही सवाल त्यांनी केला.

पूजा चव्हाण प्रकरणात सत्य कुठेही लपवले जाणार नाही. त्यामुळेच दोषी असतील त्यांच्यावर मुख्यमंत्री नक्कीच कारवाई करतील असे त्या म्हणाल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात याआधीच सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. या संपुर्ण प्रकरणात सध्या तपासकार्य सुरू असून सरकार वस्तुस्थितीपर्यंत पोहचेल. या प्रकरणातील सत्य लपवले जाणार नाही असेही गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. या सगळ्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्याने सखोल चौकशी होईल असेही त्यांनी सांगितले. या संपुर्ण प्रकरणात तपास यंत्रणांकडून होत असलेल्या कामाबद्दल नीलम गोऱ्हे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच प्रसारमाध्यमांनाही जबाबदारीने वार्तांकन करण्याची विनंती त्यांनी केली आहे. या प्रकरणातील तपासादरम्यान जर माहिती लीक होत असेल तर त्याचा परिणाम हा तपासावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जे दावे तपासादरम्यान करण्यात येत आहे त्याबाबतही नीलम गोऱ्हे यांनी नाराजी व्यक्त केली. देशात शक्तीसारख्या कायद्याची अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


- Advertisement -

हे ही वाचा – पवारांसारखा माढ्यातून माघार घेण्याचा प्रकार मी केला नाही, मी लढलो – चंद्रकांत पाटील


 

- Advertisement -