घरताज्या घडामोडीग्रँट रोड परिसरात इमारतीचा भाग कोसळला!

ग्रँट रोड परिसरात इमारतीचा भाग कोसळला!

Subscribe

मुंबईच्या ग्रँट रोड परिसरामध्ये एका इमारतीचा बाजूचा काही भाग कोसळल्याची घटना आज सकाळी घडली आहे. ग्रँट रोड पूर्व भागातल्या शापूर बाग परिसराच्या जलभाई लेनमध्ये ही दुर्घटना घडली. या भागात असलेल्या एडनवाला बिल्डिंगच्या बाजूचा काही भाग दुपारी अचानक कोसळला. या घटनेमध्ये कुणीही जखमी झालं नसल्याची माहिती मिळाली आहे.

grant road building collapse

- Advertisement -

grant road building collapse

दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलीस आणि १०८ रुग्णवाहिका (Ambulance) घटनास्थळी दाखल झाली. दरम्यान, इमारतीचा भाग कोसळला, तेव्हा खाली कुणी उपस्थित नसल्यामुळे दुर्घटनेत सुदैवाने कुणीही जखमी झालं नसल्याची माहिती देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -