घरमुंबईलोकलवर पुन्हा निर्बंध येण्याची दाट शक्यता

लोकलवर पुन्हा निर्बंध येण्याची दाट शक्यता

Subscribe

कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन राज्यात वीकेंड लॉकडाऊन आणि इतर दिवशी कठोर निर्बंध लादण्यात आले असून मुंबईपालिका क्षेत्रातही या निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र, लोकलमधील गर्दी कमी होत नसल्याने राज्य सरकारची डोकेदुखी वाढली असून यावर येत्या काही दिवसांत महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट संकेत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.

सध्या वेळेचे बंधन घालून सर्वच प्रवाशांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. मात्र, गेले काही दिवस कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने व रोजची आकडेवारी नवे उच्चांक गाठत असल्याने स्थिती गंभीर बनत चालली आहे.

- Advertisement -

राज्य सरकारने कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेवून वीकेंड लॉकडाऊन आणि अन्य दिवशी कठोर निर्बंध लावले आहेत. मात्र, सार्वजनिक वाहतूक सेवेतील गर्दी कमी होत नसल्याने राज्य सरकारपुढे मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. सामान्यांचा रोजगार बुडत असल्याचे लक्षात घेऊन लोकल सर्वांसाठी खुली करण्याची परवानगी आम्ही दिली होती. मात्र, मुंबई आणि परिसरात ज्या वेगाने करोना रुग्ण वाढत आहेत ते पाहता लोकलमधील गर्दी कमी करणे आवश्यक आहे. त्यातूनच लोकल पूर्ण बंद करावी की पूर्वी जसे कठोर निर्बंध घातले होते तसे पुन्हा घालावेत, यावर राज्य सरकार गंभीरपणे विचार करत आहे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -