Tuesday, April 20, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई पालिका रुग्णालयात रेमडेसिवीरच्या तुटवड्याची शक्यता

पालिका रुग्णालयात रेमडेसिवीरच्या तुटवड्याची शक्यता

कोरोनावर मात करण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहे. कोरोनावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध झाली नसल्याने रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढली आहे.

Related Story

- Advertisement -

कोरोना रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन उपयुक्त ठरत असल्यामुळे त्याची मागणी वाढत आहे. मात्र पुढील काही दिवसांमध्ये मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहे. कोरोनावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध झाली नसल्याने रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढली आहे. पालिका रुग्णालयातही या इंजेक्शनचा साठा कमी होत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एखाद्या कोरोना रुग्णांची मध्यम अथवा गंभीर प्रकृती असल्यास अशा रुग्णाला रेमडेसिवीर इंजेक्शन दिल्यास त्याचे प्राण वाचवणे शक्य आहे. पालिकेच्या नायर, सायन, आणि केईएम रुग्णालयात या इंजेक्शनचा वापर केला जात आहे. पालिकेने ३३ हजार इंजेक्शन खरेदी केली होती. त्यापैकी २,८०० इंजेक्शनचा साठा पालिकेकडे उपलब्ध आहे.

- Advertisement -

पालिका रुग्णालयात या इंजेक्शनचा साठा कमी होत असला तरी वेळीच ऑर्डर देऊन इंजेक्शन मागवण्यात येत आहेत. सध्या लक्षणे नसलेली रुग्ण आढळत असल्याने सगळ्यांनाच ही इंजेक्शन देणे गरजेचे नाही. त्यामुळे, गरजेनुसार साठा मागवण्यात येईल, असे पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

रेमडेसिवीर इंजेक्शन

  • मागणी – ३३,७२७
  • वापर – ३०, ९२७
- Advertisement -