घरताज्या घडामोडीMumbai Rain: मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव भरले, परतीच्या पावसाचीही हजेरी

Mumbai Rain: मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव भरले, परतीच्या पावसाचीही हजेरी

Subscribe

मुंबई शहर आणि उपनगरात सोमवारी सायंकाळनंतर विजेच्या कडकडाटासह परतीच्या पावसाने ‘बरसात’ सुरू केली. रविवारी सायंकाळनंतर उपनगरातील काही भागात परतीचा पाऊस काही वेळ बरसला होता. त्यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातही चांगला पाऊस पडल्याने तलाव भरलेल्या स्थितीत आहेत. ही मुंबईकरांसाठी समाधानाची बाब आहे.

ऑक्टोबर हिटमुळे मुंबईकरांच्या अंगातून कमी मेहनत केल्यानंतरही घामाच्या धारा बरसत आहेत. त्यात पावसाच्या धारा बरसल्याने मुंबईकर काहीसा सुखावला गेला. गतवर्षी परतीच्या पावसाने १३ ऑक्टोबर रोजी मुंबईतून काढता पाय घेतला होता. यंदा मुंबईत मान्सूनचे आगमन १३ जून रोजी झाले होते. आता ११ ऑक्टोबरपर्यंत तरी परतीचा पाऊस मुक्कामी राहिला, हे स्पष्ट झाले. मान्सून मुंबईतून गेल्याची घोषणा हवामान खात्याने अद्यापही केलेली नाही.

- Advertisement -

तलावांतील पाणीसाठा स्थिती

तलाव पाणीसाठा         दशलक्ष लि.

अप्पर                     २,२६,५६५
वैतरणा

- Advertisement -

मोडक                    १,२८,९१०
सागर

तानसा                    १,४३,८८७

मध्य वैतरणा              १,९०,६६६

भातसा                    ७,१४,२९४

विहार                     २७,६९८

तुळशी                     ७,९८६
—————————————– —– —-
एकूण                     १४,४०,००६
पाणीसाठा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -