घरताज्या घडामोडीमहापालिका मुख्यालयासमोरील खड्ड्यातूनच अधिकाऱ्यांचा प्रवास

महापालिका मुख्यालयासमोरील खड्ड्यातूनच अधिकाऱ्यांचा प्रवास

Subscribe

मुंबई महापालिका दरवर्षी नवीन रस्त्यांच्या बांधकामासाठी आणि दुरुस्तीसाठी किमान २ हजार कोटी रुपये खर्च करते. तसेच रस्त्यांवर पडणारे खड्डे बुजविण्यासाठी दरवर्षी किमान दीड कोटी रुपये तरी खर्च करण्यात येतात. मात्र तरीही रस्त्यांवर खड्डे पडतातच. मुंबई शहराचा दैनंदिन कारभार ज्या मुंबई महापालिका मुख्यालयामधून हाकण्यात येतो त्याच्या समोरील रस्त्यावरच एक-दोन नव्हे तर चार-चार खड्डे पडले आहेत.

विशेष म्हणजे याच खड्ड्यांमधून मुंबई महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, महापौर, उप महापौर, गटनेते, नगरसेवक यांच्या गाड्या ये-जा करतात तरी एकाही अधिकाऱ्याला हे खड्डे बऱ्याच दिवसांपासून दिसले कसे नाहीत? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.

- Advertisement -

पालिकेने तर गेल्या वर्षी खड्डे दाखवा आणि ५०० रुपये मिळवा, अशी योजना राबवली. त्याचा नागरिकांना आर्थिक लाभ झाला. पालिका मुख्यालयाच्या गेट क्रमांक ७च्या समोरील पालिका मार्गावर सीएसएमटी रेल्वे स्थानक मार्गे मेट्रो सिनेमाकडे जाताना रस्त्यावर चार-चार खड्डे पडलेले आहेत. त्यामध्ये दोन खड्डे हे अडीच फूट लांब तर दीड फूट रुंदीचे आहेत. तर उर्वरित दोन खड्डे हे किमान एक बाय एक फुटाचे आहेत. या खड्ड्यांमधून जाणाऱ्या वाहनांमुळे खड्डा मोठा मोठा होत असून या खड्ड्यातील डांबर मिश्रीत खडी रस्त्यावर पसरत आहे. मात्र या खड्ड्यांकडे कोणाचेच लक्ष कसे गेले नाही अथवा लक्ष जात नाही, हे खड्डड कोणाच्याच लक्षात कसे आले नाहीत, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. हे खड्डे कधी बुजवणार किंवा हे खड्डे बुजवायला पालिका कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहे का, अशी शंकाही निर्माण झाली आहे.


हेही वाचा – दक्षिण मुंबई युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी महिला बाजी मारणार?

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -