Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई सत्तासंघर्षाचे काउंटडाऊन : सर्वोच्च निर्णयाला उरले काही तास; पाहा कोण काय म्हणाले

सत्तासंघर्षाचे काउंटडाऊन : सर्वोच्च निर्णयाला उरले काही तास; पाहा कोण काय म्हणाले

Subscribe

मुंबई : सत्तासंघर्षाचा निकाल आज (11 मे) सकळी 10.30 वाजता लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरणार की नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. हे 16 आमदार अपात्र ठरले तर शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल असे कायेदतज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाकडे महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून राहिले आहे. या निकालावर काही राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या आपण पाहूया…

१४५ आमदारांचं पाठबळ असेपर्यंत या सरकारला धोका नाही – अजित पवार
सत्तासंघर्षाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, गेले ११ महिने हे सराकर काम करत आहे. त्यामुळे कितीही बोललं गेंल की हे सरकार घटनाबाह्य आहे. तरीही लोकशाही मार्गाने या सरकारचं काम सुरु आहे. त्यामुळे १४५ आमदारांचं पाठबळ असेपर्यंत या सरकारला धोका नाही.

- Advertisement -

बोलण्यास नकार देत सर्वांना शुभेच्छा दिल्या – एकनाथ शिंदे
सर्वोच्च न्यायलयाच्या निकालाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. त्यांनी हात जोडून सर्वांना शुभेच्छा म्हणत काढता पाय घेतला.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाही – देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “हा मुर्खांचा बाजार आहे, एकनाथ शिंदे राजीनामा का देतील.  एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाहीत. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. आगामी निवडणूक ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आम्ही लढू.”, राज्याचे सरकार स्थिर आहे का?, यावर उपमुख्यमंत्री म्हणाले, “राज्याचे सरकार हे एकदम स्थिर आहे.  असे कोणतेही कारण नाही की, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाही.”

- Advertisement -

निकाल संविधानाच्या बाजूने लागणार आहे – संजय राऊत
विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे कायदेतज्ज्ञ आहेत. मात्र त्यांच्या आधी नरहरी झिरवाळ हे विधानसभा उपाध्यक्ष आहेत. त्यांनाही कायद्याचे ज्ञान आहे. त्यांनीही एक निर्णय घेतला आहे. तो निर्णय चुकीचा आहे की नाही हे न्यायालय ठरवेल. त्यामुळे येत्या काही तासांतच सर्व चित्र स्पष्ट होईल, असे संजय राऊत यांनी सांगतिले. कायदा आता सर्वांना थोडा फार तरी कळतो. परिणामी काय चुकीचे आणि काय बरोबर हे लवकरच सर्वांना कळेल. सत्ताधारी म्हणत असतील त्यांच्या बाजूने निकाल लागेल. आम्ही असं अजिबात म्हणणार नाही की निकाल आमच्या बाजूने लागेल. निकाल संविधानाच्या बाजूने लागणार आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालय भारताची लोकशाही समृद्ध करणारा निकाल देईल – अनिल देसाई
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल भारताची लोकशाही समृद्ध करणारा असेल. हा निकाल आमच्याच बाजूने लागेल, अशी आम्हाला खात्री आहे. या निर्णयाची संपूर्ण जग वाट पाहत आहे. याची उत्सुकता प्रत्येकाला आहे. सत्तासंघर्षाच्या प्रत्येक सुनावणीला हजर होतो. या निकालावेळीही दिल्लीत असेन. जी जबाबदारी दिली आहे, ती जबाबदारी मी पार पाडेन. सर्वोच्च न्यायालय भारतीय संविधानाला धरुन आणि भारताची लोकशाही समृद्ध करणारा निकाल देईल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. संविधानात ज्या तरतूदी आहेत. त्या तरतुदींप्रमाणेच निर्णय ते देतील, अशी खात्री आहे. न्यायालया जो निर्णय देईल, त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करु, असं अनिल देसाई यांनी म्हटलं आहे.

न्यायदेवता मी दिलेला निर्णय मान्य करेल – नरहरी झिरवळ
सत्तासंघर्षाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना नरहरी झिरवळ म्हणाले की, १६ आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय मी कुठल्याही आकसापोटी किंवा कुठल्याही अन्य कारणापोटी घेतला नव्हता. कायद्याच्या चौकटीतील नियमानुसार मी त्यांना अपात्र ठरवले होते. त्यामुळे मला अपेक्षा आहे की, न्यायदेवता मी दिलेला निर्णय मान्य करेल. १६ आमदारांना अपात्र ठरवण्याचा मी घेतलेला निर्णय चूक की बरोबर हे सर्वोच्च न्यायालयाने ठरवले असेल तर आत्ताचाही निर्णय ते माझ्याकडेच  देतील. घटनेला धरूनच मी निर्णय दिला आहे, त्यामुळे माझा आत्मविश्वास मला हे पक्कं सांगतो की, मी दिलेला निर्णय मान्य केला जाईल, असेही झिरवळ यांनी सांगितले.

सामान्य माणसाला काही घेणेदेणं नाही – छत्रपती संभाजीराजे
सत्तासंघर्षाच्या निकालात कोण अपात्र होणार नाही होणार याच्याशी सामान्य माणसाला काही घेणेदेणं नाही. सामान्य माणसाला आपल्या विकासाबद्दल आमदारांकडून बोलणे अपेक्षित आहे. आता हे आमदारांची आपली खुर्ची ठिकवण्यासाठी धावपळ सुरू आहे.

- Advertisment -