घरCORONA UPDATEपीपीई किट सतत घातल्यामुळे मुंबईतील डॉक्टारांना जाणवू लागलेत 'साईड इफेक्ट'

पीपीई किट सतत घातल्यामुळे मुंबईतील डॉक्टारांना जाणवू लागलेत ‘साईड इफेक्ट’

Subscribe

कोरोनाचे संक्रमण वाढू लागल्यापासून डॉक्टर कोविड योद्धे म्हणून काम करत आहेत. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर तासनतास पीपीई किट घालून वॉर्डमध्ये काम करत आहेत. पीपीई किटमध्ये गुदमरल्यासारखे होणे, तणाव, थकवा तर जाणवतो. मात्र आता एक नवीन गोष्ट समोर येत आहे. पीपीई किटमध्ये अनेक महिने काम केल्यानंतर आता याचे काही विपरीत परिणाम डॉक्टरांवर झाल्याचे समोर आले आहे. डॉक्टरांकडून वजन कमी होण्याच्या तक्रारी यायला लागल्या आहेत. इंडिया टुडे या वेबसाईटने याबाबत बातमी दिली आहे.

मुंबई मधील अनेक डॉक्टरांनी वजन कमी झाल्याच्या तक्रारी दिल्या आहेत. “पीपीई किटमध्ये काम करणे तितके सोपे नसते. यामध्ये गुदमरल्यासारखे होते. पीपीई किटमध्ये खूप घाम येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टरांच्या शिफ्टमध्ये पीपीई किट उतरवताही येत नाही. पीपीई किट घातलेला असताना शौचालयालाही जाता येत नाही. कारण त्यासाठी पुर्ण पीपीई किट काढावे लागते. जर ते काढले तर त्यानंतर पुन्हा नवे किट घालावे लागते. जेव्हा आमची शिफ्ट संपवून आम्ही पीपीई किट उतरवतो, तेव्हा आम्ही पुर्ण थकलेलो असतो. त्यामुळे आता आम्हाला वजन उतरल्याची आणि प्रचंड तणाव येत असल्याचे जाणवत आहे.”, अशी माहिती मुंबईतील निवासी डॉक्टरने इंडिया टुडेकडे दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -