घरCORONA UPDATEज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे सुखरूप; 'त्या' अफवांना शिवसेना नेत्याने दिला पूर्णविराम

ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे सुखरूप; ‘त्या’ अफवांना शिवसेना नेत्याने दिला पूर्णविराम

Subscribe

ज्येष्ठ वृत्तनिवेदक व सूत्रसंचालक प्रदीप भिडे यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. मात्र प्रदीप भिडे सुखरूप असल्याची माहिती आता समोर येत आहे. शिवसेना नेत्या डॉ. मनीषा कायंदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. प्रदीप भिडे सुखरूप आहेत. त्यांच्या घरातच आहेत. त्यांच्या निकटवर्तीयांशी बोलणे झाले असल्याचे मनीषा कायंदे यांनी ट्विटर पोस्टमध्ये नमूद केले आहे. त्यामुळे त्यांच्या निधनाचे वृत्त ही केवळ अफवा असल्याचे त्यांच्या ट्विटर पोस्टवरून स्पष्ट होत आहे.

- Advertisement -

सोशल मीडियावर निधनाची बातमी

सध्या सोशल मीडिया माध्यम खुपच प्रभावी झाले असून सर्व ताज्या घडामोडी सोशल मीडियातून त्वरीत व्हायरल होत आहेत. मात्र बरेचदा व्हायरल होणारी माहिती खरी की खोटी याची पडताळणी केली जात नाही. अनेकदा ते वृत्त केवळ अफवा असल्याचे समोर येते. अशीच अफवा ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांच्या निधनासंबंधी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रदीप भिडे काळाच्या पडद्याआड गेले असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अशी पोस्ट या फेसबुकमध्ये पाहायला मिळत आहे. मात्र मनीषा कायंदे यांनी या अफवांना पूर्णविराम देत, भिडे सुखरूप असल्याचे सांगितले आहे.

वृत्त निवेदक प्रदिप भिडे काळा च्या पडद्याआड मनसे भावपुर्ण श्रद्धांजली

Posted by Ravindra Kothawade on Wednesday, July 15, 2020

- Advertisement -

हेही वाचा –

“गिरीश मला कोविड झाला तर..”, फडणवीसांच्या त्या वक्तव्याने भाजप नेत्यांच्या अंगावर शहारे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -