मला महाराष्ट्राची कडकडून आठवण येऊ लागते, हिमाचलमध्ये सोलो ट्रिप एन्जॉय करताना प्राजक्ताची ती पोस्ट चर्चेत

प्राजक्ता तिच्या कामात सतत व्यस्त असते आणि पण तरीही तिने तिच्या या व्यस्त शेड्युल मधून स्वतःसाठी वेळ काढत हिमाचल प्रदेशमध्ये ती तिची ट्रिप एन्जॉय करताना दिसते आहे. प्राजक्ताची हि पहिलीच सोलो ट्रिप(solo trip) आहे. पण तिला ह्या ट्रिप दरम्यान निसर्गाच्या सानिध्यात असतानाही महाराष्ट्राची खूप आठवण येते आहे.

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (prajakta mali) सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. प्राजक्ताने तिच्या अभिनयाने सर्वांच्याच मनात स्वतःचं एक वेगळं आणि हक्काचं स्थान निर्माण केले आहे. प्राजक्ता तिच्या कामात सतत व्यस्त असते आणि पण तरीही तिने तिच्या या व्यस्त शेड्युलमधून स्वतःसाठी वेळ काढत हिमाचल प्रदेशमध्ये ती तिची ट्रिप एन्जॉय करताना दिसते आहे. प्राजक्ताने नुकतीच तिची एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ती मस्त फिरताना सुद्धा दिसत आहे. तिच्या या पोस्टची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगताना दिसते आहे.

प्राजक्ता माळीने शेअर केलेली पोस्ट 

प्राजक्ता माळी (prajakta mali) सध्या हिमाचल प्रदेशमध्ये (himachal pradesh) तिची ट्रिप एन्जॉय करते आहे. आणि तिथले स्वतःचे फोटो सुद्धा ती सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. प्राजक्ताची हि पहिलीच सोलो ट्रिप(solo trip) आहे. पण तिला ह्या ट्रिप दरम्यान निसर्गाच्या सानिध्यात असतानाही महाराष्ट्राची खूप आठवण येते आहे. दरम्यान प्राजक्ताने तिचे ट्रिपचे फोटो शेअर करत कॅप्शन दिले आहे की, ”पण खरं सांगू कुठल्याही सुंदर प्रदेशाचा मी जास्तीत जास्त ५ ते ६ दिवस आनंद घेऊ शकते. नंतर (काम नसेल तर ) मला महाराष्ट्राची कडकडून आठवण येऊ लागते. हो आत्ताच पळून यावं इतकी आठवण येतेय. देवा… कसं होणार माझं ?”

प्राजक्ताला हिमाचल प्रदेशमध्ये (himachal pradesh) जाऊन ४ ते ५ दिवस झाले आहेत. पण अशातच तिला महाराष्ट्राची खूप जास्त आठवण येतेय. प्राजक्ताने तिचे हिमाचल प्रदेश च्या सोलो ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर टाकले आहेत. तिच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. प्राजक्ताचे हे फोटो पाहून असंच वाटत आहे की, हिमाचलच्या निसर्गामुळे प्राजक्ताच्या सौंदर्यातही अधिक भर पडली आहे. या ट्रिप मुळे तिच्या बिझी शेड्युल मधून तिला आराम मिळाला आहे.

सध्या प्रजकता माळी सूत्रसंचालन, वेब सिरीज आणि चित्रपट या तीनही माध्यमंध्ये काम करत आहे. तिचे चाहते नेहमीच तिच्या भूमिकांचं कौतुक करत असतात. सध्या प्राजक्ता माळी ‘रानबाजार’ (ranbazar) या वेब सिरीज मधून प्रेक्षकांना दिसते आहे. ‘रानबाजार’ या वेब सिरीज मधल्या प्राजक्ताच्या या भूमिकेचं मोठ्या प्रमाणात कौतुक सुद्धा होत आहे. त्याच बरोबर ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ (maharashtrachi hasyjatra) या कार्यक्रमामध्ये प्राजक्ता सूत्रसंचालन करताना दिसते आहे. तिच्या सूत्रसंचालनाचंही कौतुक होत आहे.